शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:14 PM

शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दिले रक्त : तरूणाने व्यक्त केला संताप, तिरंगा चौकात चक्री धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.येथील तिरंगा चौकात शेतकरी संघर्ष समितीने अभिनव चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी दुसऱ्या दिवशी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी म्हणून रक्तदान केले. यावेळी जवळपास २५ शेतकऱ्यांनी रक्तदान केले. शेतकऱ्यांच्या रक्तात मदतीचा, दातृत्वाचा डीएनए असून सरकारच्या रक्तात मात्र मदतीचा, दातृत्वाचा डीएनएच नाही, असा आरोप शेतकºयांनी केला. सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी, शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून हे रक्तदान असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.शेतकरी देशोधडीला लागत असताना सरकार मूग गिळून आहे. हे सरकार अत्यंत कोडगे झाले. सरकारमध्ये गब्बरसिंग बसले आहेत. यात काही मुंबईत, तर काही दिल्लीत बसले आहे. ते शेतकऱ्यांना लुटायचे काम करीत आहे, असा आरोप शेतकºयांनी केला. यावेळी पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारवर आसूड ओढताना विविध उदाहरणे देत सरकारचा कोडगेपणा दर्शविला. देशभक्ती, भारत माता की जय, गोवंश संरक्षण, आदींच्या नावाखाली सरकार दहशत पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा.घनश्याम दरणे, अशोक बोबडे, स्वाती येंडे, माधुरी अराठे, जितेंद्र मोघे, दिनेश गोगरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.युवकाने रक्त फेकून केला निषेधरक्तदान सुरू असताना बिशन शिंदे नामक शेतकऱ्याने हाताची सुई काढून रक्ताची पिशवी तेथील फलकावर फेकून शासनाचा निषेध केला. या फलकांवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या सरकारने केवळ शेतकऱ्यांचे रक्त शोषणाचेच काम केले असून मदतीचा हात दिला नाही. आता सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. नंतर शिंदे यांना उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आंदोलन मंडपात काही काळ गोंधळ उडाला होता.