शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पांढरकवडा, दारव्हा येथे तरुणांचा निर्घृण खून

By admin | Published: February 25, 2017 12:53 AM

दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली.

रामगावमध्ये कोयत्याने वार : पांढरकवड्यात तिघांना अटक दारव्हा/पांढरकवडा : दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली. रामगाव येथे कोयत्याने वार करून तरुणाला ठार मारले तर पांढरकवडा येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचा लोखंडी पाईपने डोक्यावर प्रहार करून निर्घृण खून करण्यात आला. पांढरकवडा येथील गुंड प्रवृत्तीच्या पंकज प्रकाश मडकाम (२५) याची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तीन युवकांनी धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने प्रहार करून निर्घृण हत्या केली. एसटी आगाराच्या बाजूने असलेल्या क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर ही हत्या झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज मडकामवर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. तो शस्त्राचा धाक दाखवून पैसे उकळायचा. दारूसाठी कुणालाही धमकी देत होता. गुरुवारपासून आरोपी मिथून उईके, कुणाल भगत रा. पांढरकवडा व शेखर देशट्टीवार रा. सोनबर्डी या तिघांना तो दारूसाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही देत होता. या प्रकाराला कंटाळून या तिघांनी त्याला संपविण्याचा कट आखला. पंकज आपला मित्र विक्रम जेधेसह एसटी आगाराच्या बाजूला असलेल्या स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याने शुक्रवारी सायंकाळी जात होता. त्यावेळी या तिघांनी पंकजच्या डोक्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला तसेच धारदार शस्त्रानेही त्याला भोसकले. यात पंकज जागीच ठार झाला. तर विक्रम जेधे याच्याही डोक्यावर आरोपींनी वार केले. मात्र तो रक्तबंबाळ अवस्थेत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात पळत गेला. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेथून रक्ताने माखलेला लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. खुनानंतर आॅटोरिक्षाने पळून जाणाऱ्या या तिघांचा ठाणेदार गुलाबराव वाघ व सहकाऱ्यांनी पाठलाग केला. अवघ्या दहा मिनिटात कोंघारा येथील पेट्रोल पंपाजवळ तिघांनाही अटक केली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) येथील विजय भीमराव चव्हाण (२३) याचा गुरूवारी रात्री ८ वाजता गावाशेजारी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्याच्या मानेवर कोयत्याने वार केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता गावातीलच आरोपी विजय गोबरसिंग पवार (५०) याने त्याचा खून केल्याचे पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी धान्याच्या पोत्यात लपवून ठेवलेला रक्ताने माखलेला कोयता जप्त करण्यात आला. तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहिले या कारणावरून निर्माण झालेल्या वादात हा खून झाल्याचे पुढे आले आहे. दोघेही गुरूवारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातच वाद होऊन विजय पवारने विजय चव्हाणच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी मृताचे वडील भीमराव किसन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम, पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रीेटवार, कैलास लोथे, रणजीत रबडे, करीत आहे. (लोकमत चमू)