लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आपले जीवन असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.तालुक्यातील चिरकुटा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. चिरकुटा येथे नवीन ग्रामपंचायत भवन व तलाठी भवनाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ना. राठोड यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. भविष्यात रोजगार, उद्योग, शेती, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करून घराघरात समृद्धी निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी डॉ. विष्णू उकंडे यांनी ना. संजय राठोड यांच्या माध्यमातून मतदारसंघात तीन हजार कोटींची विकास कामे मंजूर झाल्याचे सांगितले. या पैकी बहुतांश कामे पूर्णत्वास गेल्याचेही स्पष्ट केले. ना.राठोड यांनी मतदारसंघातील जनतेला स्वाभिमान वाटेल असेच काम यापुढेही करणार असल्याची ग्वाही दिली. विकासासाठी भरीव निधी देण्याचेही आश्वासन दिले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, दिवाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, नायब तहसीलदार इंगोले, गुणवंत राऊत, रवी काळे, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव व गावकरी उपस्थित होते.
सामान्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:23 PM
जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आपले जीवन असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. तालुक्यातील चिरकुटा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.
ठळक मुद्देसंजय राठोड : चिरकुटात विकास कामांचे लोकार्पण