लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील दोन तरूणांचे मृतदेह ढाणकी मार्गावरील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रविवारी सकाळी आढळून आले. हे दोघेही चुलत भाऊ असून शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.इंद्रजित भीमराव रूढे (३५) आणि प्रेम ऊर्फ बिन्नी धारा रूढे (१८), दोघेही रा. गुलाबसिंगनगर उमरखेड अशी मृतांची नावे आहे. शुक्रवारी हे दोघेही सकाळी शौचासाठी ढाणकी मार्गावरील नाल्याकडे गेले होते. परंतु परत आले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु थांगपत्ता लागत नव्हता. याच परिसरातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीतही शोध घेतला. परंतु काहीच हाती लागले नाही. दरम्यान, रविवारी सकाळी त्याच पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाली. नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. तेथे इंद्रजित आणि प्रेम यांचे मृ्तदेह तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दिवाळीच्या पर्वात दोन चुलत भावांंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे मात्र कळू शकले नाही.
चुलत भावांचे मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:08 AM
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील दोन तरूणांचे मृतदेह ढाणकी मार्गावरील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रविवारी सकाळी आढळून आले.
ठळक मुद्देउमरखेडची घटना : शुक्रवारपासून दोघेही होते बेपत्ता