लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहेत.घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी गळफास आणि नंतर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस नरेंद्र मोदी सरकार आपल्या आत्महत्येस जबाबदार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणला. एक कोटीची आर्थिक मदत आणि मुलीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी करत मृतदेह घेण्यास नकार दिला होता. शुक्रवारी दुपारपर्यंत हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता. दरम्यान, यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. परिवारासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक राजूरवाडी येथे दाखल झाले. या प्रश्नावर आंदोलन करणारे शेतकरी न्याय हक्क समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनाही पोलीस ठाण्यातून चचेर्साठी राजूरवाडी येथे नेण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. परिणामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता.
सरकारच्या नावे चिट्ठी लिहिलेल्या शेतकऱ्याचा देह तिसऱ्या दिवशीही शवागारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:25 PM
मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले.
ठळक मुद्देचचेर्साठी राजूरवाडीला महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी दाखल