आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी आता बिरसा ब्रिगेडने राज्यभरात उलगुलान सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी यवतमाळातून करण्यात आला.शासकीय धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील सर्व जिल्ह्यात बिरसा ब्रिगेड आंदोलन करणार आहे. सोमवारी यवतमाळातून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. तिरंगा चौकात झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या नोकºया बळकावल्या आहेत. या जागा रिक्त करण्यात याव्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिला. या निर्णयाची शासनाने काटेकोर अमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात शासनाने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. यामुळे बोगस आदिवासी खºया आदिवासींच्या जागा काबिज करून बसले आहेत. खºया आदिवासींना न्याय मिळावा, अशी मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.या धरणे आंदोलनात बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, राज्य संघटक जयवंत वानोळे, विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, अॅड. रामदास भडांगे, नीलेश पंधरे, विद्यार्थी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोतिष सिडाम, नागेश कुमरे, विलास टेकाम, अमोल मडावी, जगदीश मडावी, योगेश मिरासे, पृथ्वीराज पेंदोर, गजानन साबळे, माधुरी अंजीकर, अनिल आत्राम, गणेश सलाम, रामदास भिसे, सुशिल भुरके यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते.
बोगस आदिवासींविरुद्ध उलगुलान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:36 AM
आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे.
ठळक मुद्देबिरसा ब्रिगेडचे धरणे : कारवाई टाळणाºया शासनाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध