लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील वाढोणा या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाड टाकून एका घरात साठविलेले बीटी कपाशीचे ७४ हजार रूपये किंमतीचे १०० पॉकेट सोमवारी जप्त केले.याप्रकरणी आरोपी एस.मल्याद्री (४२) रा.आरएस पोठा ओंगोळ (आंध्रप्रदेश) याच्यावर भादंवि कलम ४२०, ४२३, ४६५, ४७१ व बियाणे अधिनियम १९६८ क्रमांक ७, ८, ९, ११, १२, १३, १४ तसेच बियाणे अधिनियम १९६६ क्रमांक ७, महा. का.वि. अधि २००९ व नियम २०१० क्र.१० पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम १५, १६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशीच्या बनावट बियाणांची विक्री सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस बीटीची विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. येथील उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना वाढोणाबाजार येथे बनावट बीटी कपाशीचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे राहुल सातपुते, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल गुल्हाने, प्रभारी कृषी अधिकारी सोनाली कवडे, कृषी विस्तार अधिकारी राहुल डंभारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राहुल किटे, जमादार राहुल खंडागळे, गजानन नव्हाते हे वाढोणा येथे गेले. शार्दुलसिंग चहाल यांच्या शेतातील गोठ्यात आरोपी एस.मल्ल्याद्री याने बनावट बियाणाचा साठा करून ठेवला होता. या गोठ्याची झडती घेतली असता, ७४ हजार रूपयांचे बनावट बी.टी.चे १०० पॉकेट आढळून आले. या पॉकेटवरील बियाणे उत्पादक व विक्रेत्याचे नाव तथा गुणवत्तेचा बनावट उल्लेख आढळून आला. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली.
बोगस बीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:01 AM
तालुक्यातील वाढोणा या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाड टाकून एका घरात साठविलेले बीटी कपाशीचे ७४ हजार रूपये किंमतीचे १०० पॉकेट सोमवारी जप्त केले.
ठळक मुद्दे७४ हजारांचा मुद्देमाल : वाढोणा येथे कारवाई