शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

‘एसटी’च्या बोगस पासचा भंडाफोड

By admin | Published: January 12, 2017 12:44 AM

वाहकाच्या सतर्कतेमुळे एसटी महामंडळाच्या हंगामी बोगस पासचा भंडाफोड झाला आहे.

कर्मचारी निलंबित : दारव्हा आगारातून तयार झाल्या पास यवतमाळ : वाहकाच्या सतर्कतेमुळे एसटी महामंडळाच्या हंगामी बोगस पासचा भंडाफोड झाला आहे. सावंतवाडी ते पुणे प्रवास मार्गावर हा प्रकार उघडकीस आला. कलर झेरॉक्स करून प्रवाशांना पासेस दिल्याचे स्पष्ट झाल्याने दारव्हा आगाराच्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. सावंतवाडी आगाराच्या सावंतवाडी ते पुणे बसमध्ये कोल्हापूर येथून कराड येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी दिलेल्या हंगामी पासविषयी वाहकाला संशय आला. दोनही पास एकाच क्रमांकाच्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रवाशांनी दारव्हा आगारातून पास उपलब्ध करून घेतल्याचे सांगितले. पुढील तपासाच्यादृष्टीने संबंधितांनी दारव्हा आगाराशी संपर्क केला. दोनही पासचा क्रमांक एकच असल्याचे स्पष्ट झाले. दारव्हा येथील अक्षय अरविंद पोपळे आणि विकास प्रल्हाद तायडे यांच्याकडे या पास आढळल्या. मात्र ४ जानेवारी रोजी दारव्हा आगार पास वितरण केंद्रातून सदर दोघांच्या नावांची किंवा इतरही कुणाची हंगामी पास वितरित झाली नसल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात वाहतूक शाखेने चौकशी सुरू केली. यामध्ये कोऱ्या पासेसच्या कलर झेरॉक्स करून बनावट पासेस प्रवाशांना दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. या आधारे पास वितरण करणारे दारव्हा आगाराचे कर्मचारी ज्ञानेश्वर नारायण चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हा प्रकार किती काळापासून सुरू होता, याचा शोध एसटीच्या वाहतूक शाखेकडून घेतला जात आहे. एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाची दक्षता शाखाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. (वार्ताहर)