यवतमाळ : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमंचने जिल्ह्यात बस देखो आंदोलन केले. प्रवाशांच्या हाताला ‘विदर्भाचे बंधन’ असे लिहून असलेले बंधन बांधण्यात आले. जाणीव जागृतीसाठी पत्रके वाटण्यात आली. यवतमाळसह वणी, उमरखेड, दारव्हा, बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, राळेगाव येथे आंदोलन झाले.विदर्भवाद्यांनी प्रवाशांना विदर्भ बंधनाचे बँड बांधले, अर्ज भरून घेतला. ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ असे नारे देण्यात आले. वेगळा विदर्भ असे अंकित असलेल्या टोप्या घालून असलेले विदर्भवादी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी जनमंचचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे पाटील, अशोक कंचलवार, प्रशांत बनगिनवार, नितीन गिरी, अजय मुंधडा, बाळासाहेब शिंदे पाटील, राजू पडगिलवार, विनोद आरेवार, मनोज औदार्य, दत्ता चांदुरे, अॅड. अजय चमेडिया, अॅड रवी बदनोरे, सुभाष पातालबन्सी, मधुकर निवल, विवेक कवठेकर, राजू खंडाळकर, विजय कदम, जितेंद्र हिंगासपुरे आदी उपस्थित होते. आंदोलनात विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
वेगळ्या विदर्भासाठी बांधले बंधन
By admin | Published: August 09, 2014 11:56 PM