लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील पंचायत समितीच्या मासिक सभेवर गुरूवारी सभापती, उपसभापतींसह सर्व दहाही सदस्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सभा रद्द करावी लागली.पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात कपात करण्यात आली. त्यांना कुठलेच अधिकार नसल्यामुळे हे पद नावाला उरल्याची भावना सदस्यांमध्ये आहे. त्यामुळे मासिक सभेवर बहिष्कार टाकला. त्यांनी शासनाचा निषेध नोंदवित अधिकार बहाल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गुरुवारी मासिक सभा बोलाविण्यात आली होती. मात्र पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे सभा रद्द करण्यात आली. नंतर सर्व सदस्यांनी गटविकास अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यापूर्वीसुद्धा पंचायत समिती सभापती राज्य पातळीवर निवेदन व आंदोलनाचा इशारा दिला होता. एकंदरच अस्तित्वासाठी पंचायत समिती सदस्यांचा लढा सुरू आहे.सदस्यांसाठी पूर्वीप्रमाणे १४ व्या वित्त आयोगाची तरतूद करावी. जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून स्थान द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा. सदस्यांना विविध विकास कामांकरिता ५० लाखांचा निधी द्यावा, मनरेगाची कामे, सर्व वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांना मान्यता देण्याचा अधिकार द्यावा, मानधनात वाढ करावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे. निवेदनावर सभापती उषाताई चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, सदस्य नामदेव राठोड, शेषराव कराळे, संतोष ठाकरे, सविता जाधव, सुनिता राऊत, शारदा दुधे, सिंधुताई राठोड, शारदा मडावी आदींच्या स्वाक्षºया आहे.
सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 9:48 PM
येथील पंचायत समितीच्या मासिक सभेवर गुरूवारी सभापती, उपसभापतींसह सर्व दहाही सदस्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सभा रद्द करावी लागली.
ठळक मुद्देदारव्हा पंचायत समिती : अधिकार कमी केल्याचा निषेध