लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली.चौदाव्या वित्त आयोगापूर्वी विकास कामासाठी पंचायत समित्यांना निधी मिळत होता. हा निधी पूर्ववत करण्यात यावा. सदस्यांना कामकाजासाठी ५० लाखांपर्यंत निधी मिळावा. वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यात याव्या. पंचायत समितीमधून विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळावे, सभापती आणि उपसभापतींना स्वतंत्र निवासस्थान असावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या.बहिष्कार आंदोलनात सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, नंदा लडके, कांता कांबळे, सुनंदा भुजाडे सहभागी होते. तर तीन सदस्य गैरहजर राहिले. बहिष्कारामुळे पंचायत समितीची नियोजन सभा बारगळली. यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पंचायत समिती सभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 9:59 PM
अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली.
ठळक मुद्देयवतमाळचे सदस्य : अधिकार आणि निधीसाठी आंदोलन