तालुक्यात काही ठिकाणी अर्धवट स्थितीत रस्त्यांची काम पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. काही ठिकाणी कामामध्ये दर्जा राहिला नाही. योजनेवर निधी उपलब्ध नसल्याचे कारण समोर केले जात आहे. निधीच नाही, तर काय लक्ष देणार, या अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे झालेल्या कामांतील गुणवत्ता कोण तपासणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
वरोडी, वाघनाथ, हिवरदरी रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. चिलगव्हाण, वाकोडी वाडी, खडका पेढी, काळी दौ. वसंतनगर खेडी, घानमुख, दगडथर, आंबोडा, काऊरवाडी, लेवा, बारभाई तांडा आणि कवडगाव तांडा ही कामे ३० टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. निधी नसल्यामुळे कंत्राटदार पुढील कामे करण्यास तयार नाही. बहुतांश कामे पाच टक्के अधिक दराने गेली आहे. झालेल्या कामांमध्ये गुणवत्ता राहिली नाही. कामाचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष झालेले काम पाहता, रस्त्याच्या रुंदीमध्ये बरीच तफावत आढळून येतेे. काही ठिकाणच्या रस्त्याची लांबी कमी करण्यात आलेली दिसते.
बॉक्स
उर्वरित काम करण्यास कंत्राटदार अनुत्सुक
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते मुख्य मार्गाला जोडण्यात आले आहेत. या रस्त्यांमुळे नागरिकांना दळणवळणाची सुविधा झाली आहे. परंतु अर्धवट स्थितीत आणि सुमार दर्जाच्या कामामुळे या योजनेतील कामांचा आणि त्यावरील झालेल्या खर्चाचा किती फायदा झाला, हे तपासून पाहणे गरजेचे झाले आहे. या योजनेतील कामे आधीच मॅनेज करून दिली गेली होती, अशी चर्च आहे. मंजूर झालेले काम उशिराने सुरू झाले होते. आता निधीचे संकट घोंगावत असल्यामुळे उर्वरित काम करण्यासाठी कोणीही उत्सुक दिसत नाही.
कोट
योजनेतील कामासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्व कामे थांबली आहेत. ३० टक्क्यापर्यंत झालेल्या कामांचे देयक संबंधितांना अदा करण्यात आले. उर्वरित कामांसाठी निधी नसल्यामुळे कामे खोळंबली. परंतु कामात दिरंगाई झाल्यामुळे कुणावर कारवाई किंवा दंड आकारण्यात आलेला नाही. निधीची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्ध होताच पूर्ववत कामे सुरू केली जाईल.
कारिया,
सहायक उपअभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना