लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील समाज कल्याणच्या सहायक उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विशाल बापूराव कुबडे याच्या विरोधात दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.एकस्तर प्रोत्साहन भत्त्याचे वेतन निश्चिती व थकबाकी काढून देण्याकरिता कुबडे याने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये देण्याचे ठरले. २ मार्च रोजी ही रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत १२ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी व १ मार्चला सलग तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत कुबडे यांनी केलेली लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यावरून यवतमाळात कुबडेविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यवतमाळात समाज कल्याण लिपिकाविरुद्ध लाचेचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:54 PM