यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून मालकीणीसह चार महिला आणि एका अल्पवयीन मुलीसह ग्राहकाला ताब्यात घेतले. ही कारवाई भारती अपार्टमेंटमध्ये बुधवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. दारव्हा मार्गावरील भारती अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती एका जागरूक तरूणाने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना दिली. त्यावरून एसडीपीओ मदने यांनी खातरजमा करण्यासाठी तेथे बनावट ग्राहक पाठविला. त्याने खातरजमा करून इशारा देताच सापळा रचून असलेल्या पोलीस पथकाने तेथे धाड घातली. यावेळी कुंटनखाण्याच्या मालकीणीसह चार महिला, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि एका ग्राहकाला ताब्यात घेतले. वर्षभरापूर्वी आर्णी मार्गावर याच महिलेच्या कुंटणखान्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रूपाली दरेकर यांनी कारवाई केली होती. त्यावेळी तेथे वेश्या व्यवसाय करताना महिला आणि ग्राहकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र संबंधित महिलेने कुंटणखाना तेथून हलविला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
अपार्टमेंटमधील कुंटणखान्यावर धाड
By admin | Published: July 23, 2014 11:49 PM