पावसाळ्यामध्ये अनेक गावांचा तुटतो संपर्क
जीर्ण झालेला पूल बांधण्याची मागणी
फोटो
महागाव : तालुक्यातील माळेगाव नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पूल संपूर्णत: जमीनदोस्त झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नदीला मोठा पूर येतो. अशावेळी आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटतो. वाहतूक ठप्प होते. विद्यार्थी, रुग्ण, महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
तालुक्याला जाणारा हा मधला रस्ता असल्यामुळे गुंज, माळकिन्ही, माळेगाव, दहिवड, मोहदी, तुळशीनगर, वनोली, खेडी, घोनसरा, वागद, माळवागद, बोंढारा, पेढी, कोनदरी, वाकान, सातघरी, वाडी आदी गावे या रस्त्याशी जोडली गेली आहेत. नदीवर मोठा पूल व्हावा म्हणून अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला; परंतु लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नवीन पूल त्वरित व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नितीन राठोड, ज्ञानेश्वर जाधव, बिरबल राठोड, आनंदा राठोड, विश्वास पाटील, नितीन आडे, सुनील पडघने, शेखर कांबळे, विकास राठोड, दीपक राठोड, प्रमोद राठोड, गजानन जाधव, कार्तिक रावते, वैभव पवार, मिलिंद पडघने, अभिजित गिराम आदींनी दिला आहे.
010921\img-20210831-wa0000.jpg
माळेगाव च्या अरुंद पुलावरून पाणी....