पुसद : महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात हिंगणघाट येथील सरवर जानी कव्वाल यांच्या ‘झाली रमाई महान’ या बुद्ध-भीमगीतांनी रविवारी श्रोत्यांना रिझविले. येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सरवर जानी कव्वाल यांनी धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे पुष्प गुंफले. यावेळी त्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील एकापेक्षा एक गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हरिभाऊ फुपाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत गुळवे, सुनील शिरसाठ, देवानंद धबाले, ज्ञानेश्वर तडसे, अजय पुरोहित, अभय गडम, शेख कय्यूम, संजय करमनकर आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे, माजी अध्यक्ष महेश खडसे, शीतल वानखेडे, मिलिंद हट्टेकर, ज्ञानेश्वर उबाळे, गणेश वाठोरे, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, प्रा.दादाराव अगमे, यादव जांभूळकर, भगवान हनवते, भारत कांबळे, विठ्ठल खडसे, प्रभाकर गवारगुरू, साहेबराव गुजर, दत्ता गंगाळे, सिद्धांत कोल्हे, डॉ.पंजाब खंदारे, प्रशांत धुळे, अनिल कांबळे, शशांक भरणे, मुन्ना हाटे, संजय इंगोले, मनोज खिराडे आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’४महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञापर्वात मंगळवारी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग सायंकाळी ६ वाजता येथील यशवंत स्टेडियमच्या सांस्कृतिक मंचावर सादर करण्यात येणार आहे. या नाटकासाठी एक दिवस कार्यक्रमस्थळामध्ये बदल करण्यात आला असून सर्व रसिक श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी आणि नाटकाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
बुद्ध-भीमगीतांनी श्रोत्यांना रिझविले
By admin | Published: April 12, 2016 4:52 AM