१२९ विद्यार्थी व ६० कामगारांनी कार्यशाळेला हजेरी लावली. पोलीस निरीक्षक सोनाजी आमले समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, प्रमोद बनगीनवार, कल्पना पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर जाधव, विनोद जाधव, डॉ. मनोज टेवरे, बाबूसेठ इसानी, सैयद सईद अहेमद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीला कुरआनच्या अध्यायाचे वाचन मुहम्मद अनस या विद्यार्थ्याने केले. यावेळी सैयद अदनान, आर्शिया तबस्सुम, हस्सान अहेमद खान या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मोटीव्हेशनल स्पीकर सैयद सईद अहेमद यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मिर्झा अफजल बेग व आमीन चौहान यांचाही सत्कार करण्यात आला. हाजी मुजफ्फर शेख यांनी प्रास्ताविक केले. मजहर अहेमद खान यांनी संचालन केले. हाजी नूर खान पठाण, प्राचार्य हाजी एजाजुद्दीन यांनी आभार मानले.