शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
2
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
3
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
4
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
5
Sanjay Raut : 'आता दाऊदला क्लीन चिट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे, संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
6
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
7
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
8
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
9
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
10
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
11
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
12
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा
13
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
14
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप
15
गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी
16
प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."
17
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
18
"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव
19
Rohit Sharmaचं घर आहे जगातील ५० हायराईज टॉवरपैकी एकात; किती आहे किंमत, काय आहेत वैशिष्ट्ये
20
Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."

बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

By अविनाश साबापुरे | Published: July 01, 2024 7:15 PM

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी

यवतमाळ : पुढे बँडबाजा दणाणतोय.. मागे सजविलेल्या बैलबंडीत चिमुकले स्वार.. अन् त्या मागे गावकरी टाळ्या वाजवित निघालेले... हे दृश्य एखाद्या लग्नाच्या वरातीचे नव्हेतर शाळेच्या पहिल्या दिवसाच्या समारंभाचे होय. सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी अशाच नानाविध पद्धतीने विद्यार्थ्यांचे धडाकेबाज स्वागत करण्यात आले. तर शाळेत आल्यावर या विद्यार्थ्यांशी अधिकारी वर्गाने हितगुजही केले.

सोमवारी १ जुलै रोजी शाळेच्या नव्या सत्राचा आरंभ करण्यात आला. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेत येताच सर्वात पहिले चिमुकल्यांच्या हातावर शिक्षक-शिक्षिकांनी चाॅकलेट, फफॅल ठेवले. एखाद्या पाहुण्यासारखे विद्यार्थ्यांचे ‘वेलकम’ करण्यात आले. मैदानात बसवून विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने शिक्षण विभागाने शाळा भेटीचे नियोजन केले होते. त्यात सीईओ मंदार पत्की, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, सहायक गटविकास अधिकारी किशोर गोळे, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने, केंद्र प्रमुख सुदर्शन थोटे, साधनव्यक्ती शुभांगी वानखडे यांनी किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तर उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी जोडमोहा, येरद, रामपूर कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे योगेश डाफ यांनी कळंब येथील बेसिक शाळेसह पार्डीच्या जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.

सीईओंनी केला ‘इको क्लब’चा प्रारंभजिल्हा परिषदेचे सीईओ मंदार पत्की यांनी किन्ही येथील शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी  त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने इको क्लब या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

इवल्या तळहातावर जिलेबीच्या गणगड्या !येरदच्या जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या तळहातावर गोड जिलेब्याच्या गणगड्या ठेवण्यात आल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत विद्यार्थी एकमेकांशी गप्पा करण्यात गुंग झाले. तर कळंब तालुक्यातील सुकळीच्या जिल्हा परिषद शाळेने बैलबंडीतून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.

टॅग्स :School Reopening - GuideShalechi TaiyariSchoolशाळाStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ