शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे.

ठळक मुद्देपुसद मतदारसंघात काठावर विजय : वर्षागणिकचा मताधार घटतोय

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकप्रियता म्हणा की आणखी काही. पुसद विधानसभा मतदारसंघात ‘बंगल्या’चा अर्थात नाईक घराण्याचा विजय जणू विधिलिखित आहे. मात्र जेव्हा केव्हा प्रतिस्पर्धी तगडा असतो तेव्हा ‘बंगल्या’च्या अढळ स्थानाला धोका तर पोहोचणार नाही ना, अशी हुरहुर समर्थकांमध्ये असते. १९९५ च्या विधानसभेत केवळ दोन हजार १५८ मताधिक्याने ‘बंगल्या’ची प्रतिष्ठा राखली होती. जनता दलाचे उमेदवार नरेंद्र मुखरे यांनी मनोहरराव नाईक यांना नाकीदम आणला होता. अशीच काहिशी परिस्थिती यावेळच्या निवडणुकीत दिसून येत होती. इंद्रनील नाईक नऊ हजार ७०० मताधिक्य घेत विजयी झाले. ‘बंगल्या’चा घटत चाललेला मताधार नाईक घराण्यासाठी चांगले संकेत नाही, असे म्हणायला मोठा वाव आहे.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीचे वसंतराव पॉल हे सुधाकरराव नाईक यांना विजयापासून दूर ठेवतील असे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी नाईक यांना ११ हजार ५२७ मतांच्या आघाडीने विजय नोंदविता आला.बंगल्याच्या विजयाची मालिका १९९५ मध्ये नरेंद्र मुखरे यांच्या रूपाने खंडित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मुखरे यांचा विजय त्यावेळी थोडक्यात हुकला. कुटुंबातील नवीन उमेदवार मनोहरराव नाईक यांच्या रूपाने घराण्याने दिला होता. मनोहरराव नाईक यांना ६३ हजार ७३२, तर मुखरे यांनी ६१ हजार ६६४ मते घेतली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते. मनोहरराव नाईक यांचा काठावर झालेला विजय पाहता पुढील निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक रिंगणात उतरले. शिवसेनेच्या तिकीटावर नरेंद्र मुखरे त्यांच्यासमोर आले. यावेळी मात्र सुधाकरराव नाईक १५६७० मताधिक्य घेत विजयी झाले.२००४ च्या निवडणुकीनंतर मात्र नाईकांसमोर स्ट्राँग उमेदवार आला नाही. दोनवेळा आरती फुफाटे, प्रकाश देवसरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाईक घराण्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले नाही. पुढे मनोहरराव नाईक यांचा विजय ३० ते ६५ हजार मताधिक्यावर गेला. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत बंगल्यातील अनुभवी माणसं रिंगणात उतरली. आता २०१९ च्या निवडणुकीत नाईक घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार इंद्रनील नाईक या तरूणाला मैदानात उतरविले. त्यांच्यासमोर नाईक कुटुंबातीलच भाजपचे अ‍ॅड. नीलय नाईक यांनी जोरदार लढत दिली. कदाचित या मतदारसंघात नीलय निघतील असे आराखडेही मांडले जात होते. अखेरच्या क्षणी इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवित बंगल्याचा गड कायम राखला. पण नाईक घराण्याने १९९५ च्या अपवाद वगळता आतापर्यंत घेतलेल्या मताधिक्यापेक्षा सर्वात कमी (९७०१) मतांनी विजयी ठरलेले ते उमेदवार आहेत.आत्मचिंतनाचा विषयबंगल्याचा मताधार कमी होत असल्याच्या बाबीला मोठा आधार मिळतो आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अनिता नाईक यांना अतिशय कमी मतांनी विजय नोंदविता आला. अपेक्षेपेक्षा कमी मते त्यांनी घेतली होती, हे विसरता येणार नाही. निसटता का होईना विजय मिळत असल्याने बंगल्याची इभ्रत अद्याप शाबूत असली तरी सातत्याने घटणारे मताधिक्य हा बंगल्यासाठी चिंतेचा आणि तेवढाच आत्मचिंतनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :pusad-acपुसद