शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

१० सचिवांवर ६८ सहकारी संस्थांचे ओझे

By admin | Published: July 17, 2016 12:44 AM

जिल्हा बँकेशी संलग्नित असलेल्या तालुक्यातील ६८ विविध ग्राम कार्यकारी संस्थाचा कारभार केवळ १० गटसचिवाच्या भरवशावर सुरू आहे.

कर्ज वाटपासाठी कसरत : चार सेवानिवृत्त सचिवांचा हातभार वणी : जिल्हा बँकेशी संलग्नित असलेल्या तालुक्यातील ६८ विविध ग्राम कार्यकारी संस्थाचा कारभार केवळ १० गटसचिवाच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे ऐन कर्ज वाटपाच्या हंगामात हे गटसचिव कामाच्या ओझ्याखाली दबून जातात; मात्र जिल्हा बँकेकडून रिक्त जागांसाठी गटसचिवांची नेमणूक होत नसल्याने चार सेवानिवृत्त गटसचिवांचा आधार घेऊन कर्ज वाटपाचा व वसुलीचा कारभार करावा लागत आहे. तालुक्यात ६८ विविध ग्राम सहकारी संस्था आहेत. जवळपास ९० टक्के शेतकरी या संस्थांचे सभासद आहेत. जिल्हा बँक या सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वितरण करते. त्यामुळे मोठ्या संस्थेसाठी एक, तर लहान दोन संस्था मिळून एक, असे गटसचिव नेमण्यात आले होते. जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपासाठी मदत करणे व उत्पन्न निघाल्यानंतर शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणे हे कार्य गटसचिव करतात. मात्र गेल्या सात-आठ वर्षात बरेच गटसचिव सेवानिवृत्त झाले. आता केवळ १० गटसचिव कार्यरत आहेत, तर चार सेवानिवृत्त गटसचिव जवळपास २५ सहकारी संस्थाचा कारभार सांभाळत आहे. त्यामुळे हंगामात कर्जवाटप करताना गटसचिवांची धांदल उडते. तुटपुंज्या वेतनामध्ये एकावेवेळी चार-पाच संस्थाचा कारभार सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. आर्थिक बाबींशी संबंध असल्याने डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. तरीही गटसचिवांनी सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्जवाटप केले आहे. सेवानिवृत्तांना चार ते पाच हजार रूपये प्रति महिन्यातच काम करावे लागते. (स्थानिक प्रतिनिधी)