शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

विद्यार्थांच्या पाठीवर अवास्तव दप्तराचे ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 9:30 PM

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अध्ययन करण्यासाठी पुस्तक व नोटबुकांसह बऱ्याचशा शालेय साहित्याची गरज भासते. हे सर्व साहित्य विद्यार्थी दप्तरात भरून ते दप्तर पाठीवर घेतात. वेळापत्रकातील वाढलेल्या तासिकांमुळे पुस्तके व नोटबुकांची संख्या वाढते आहे. पूर्वी विद्यार्थी पुस्तके व नोटबुक हातात किंवा एखाद्या कापडी पिशवीत भरून ती पिशवी काखेत लटकवून न्यायची.

ठळक मुद्देमणक्याच्या आजाराची शक्यता : उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते दहाविच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे पुन्हा शिक्षक, पालक व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात मणक्याच्या आजाराला बळी तर पडावे लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अध्ययन करण्यासाठी पुस्तक व नोटबुकांसह बऱ्याचशा शालेय साहित्याची गरज भासते. हे सर्व साहित्य विद्यार्थी दप्तरात भरून ते दप्तर पाठीवर घेतात. वेळापत्रकातील वाढलेल्या तासिकांमुळे पुस्तके व नोटबुकांची संख्या वाढते आहे. पूर्वी विद्यार्थी पुस्तके व नोटबुक हातात किंवा एखाद्या कापडी पिशवीत भरून ती पिशवी काखेत लटकवून न्यायची. आता विविध आकाराची आकर्षक दप्तरे बाजारात मिळतात. त्या दप्तरांचेच मुळ वजन किलो-दीड किलोचे असतात. मराठी शाळेत वर्ग पाचवी ते दहाविला तीन दिवस आठ तासिका व दोन दिवस नऊ तासिका असतात. प्रत्येक तासिकेला अध्ययनासाठी एक पाठ्यपुस्तक एक नोटबुक विद्यार्थ्यांना शाळेत न्यावे लागते. तसेच कंपासपेटी, गृहपाठाच्या वह्या व इतर आवश्यक साहित्यही न्यावे लागतात. अनेक विद्यार्थी सोबत पाण्याची बॉटलपण दप्तरात नेतात.अनुदानीत शाळांमध्ये माध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र सधन घरचे अनेक विद्यार्थी शाळेतील मध्यान्ह भोजन घेत नाहीत. त्यांचे पालक त्यांना घरून जेवणाचा डबा देतात. हा डबासुद्धा दप्तरातच कोंबला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर आणखी फुगते. चार वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांना भविष्यात पाठीच्या मणक्याचे आजार होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २१ जुलै २००५ ला एक शासन निर्णय काढून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शरिराच्या वजनाच्या १० टक्के पर्यंतच असावे, अशी सूचना सर्व शाळांना केली. त्यासाठी शाळांनी वर्गखोलीत दप्तर कोपरा तयार करावा, अनावश्यक वह्या विद्यार्थ्यांना आणण्यास भाग पाडू नये व आवश्क त्या इतर उपाययोजना करण्यास सूचविले होते. शाळांनी याची अंमलबजावणी एक-दोन वर्षे केलीही. परंतु आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार वाढल्याचे दिसून येते. इंग्रजी शाळा व सीबीएसई शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तर दप्तराचे अधिक ओझे सोसत असल्याचे दिसत आहे.असे असावे दप्तराचे वजन    वर्ग                 वजनइयत्ता १ ली         २.०१० कि.ग्रॅ. इयत्ता २ री         २.२३५ कि.ग्रॅ. इयत्ता ३ री         २.५०५ कि.ग्रॅ. इयत्ता ४ थी         २.८३० कि.ग्रॅ. इयत्ता ५ वी         ३.१९५ कि.ग्रॅ. इयत्ता ६ वी         ३.२९५ कि.ग्रॅ. इयत्ता ७ वी         ३.७८५ कि.ग्रॅ. इयत्ता ८ वी          ४.२९४ कि.ग्रॅ. 

टॅग्स :Schoolशाळा