शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

वडगाव, वाघापूरमध्ये घरफोडीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 5:00 AM

वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असलेले कुटुंब जागे झाले. चोर असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आरडाओरडा करीत इतरांना मदतीला बोलाविले. याच दरम्यान, चोरटे चाकूचा धाक दाखवून तेथून पळून गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका घरात चोरीचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सातत्याने घरफोडीचे सत्र सुरू  आहे. चोरटा काही केल्यास पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी वडगाव व वाघापूर या दोन परिसरांत धुमाकूळ घातला. वाघापूर येथील सावित्रीबाई फुले सोसायटीमध्ये चोरट्यांनी नागरिकांना चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. या दोन्ही ठिकाणांवरून चोरट्यांनी जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असलेले कुटुंब जागे झाले. चोर असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आरडाओरडा करीत इतरांना मदतीला बोलाविले. याच दरम्यान, चोरटे चाकूचा धाक दाखवून तेथून पळून गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथे कुटुंबीय सजग असल्याने चोरट्यांना डाव साधता आला नाही. ते पसार झाले. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोहारा पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. चोरट्यांनी वापरलेल्या अवजारांवरील ठसे घेण्यात आले. श्वानानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर काही अंतरावर हे श्वान घुटमळले. पुढे आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी चोरीचा दाखल केला आहे. 

सत्यनारायण ले-आउटमध्ये ऑटो चालकाचे घर फोडले- वडगाव परिसरातील आर्णी मार्गावरील सत्यनारायण ले-आउटमध्ये ऑटो चालकाचे घर फोडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून एक लाख ६० हजारांची रोख व पाच हजारांची चांदी असा मुद्देमाल लंपास केला. नितीन यशवंत कांबळे हे कुटुंबीयांसह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी सायंकाळी घरी परत आले असता, त्यांना घरफोडी झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांची रात्रगस्त ठरतेय फार्स- शहरात लोहारा, यवतमाळ शहर, अवधूतवाडी हे प्रमुख पोलीस ठाणे आहेत. याशिवाय पोलीस मुख्यालय व इतर पथकातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शहरात वावर असतो. त्यानंतरही चोरट्यांवर वचक बसलेला नाही. राजरोसपणे घरफोड्या व चोरीचे गुन्हे घडत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर दररोज रात्रगस्तीचे नियोजन केलेले असते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांची गस्त होतच नसल्याचे चोरीच्या घटनांवरून दिसून येते. पूर्वी रात्रगस्तीसाठी बारकोड प्रणाली आणली होती. 

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस