ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. अवैध दारू व्यावसायिकांनी ग्रामीण भागात आता डोके वर काढले असून याकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत वाढत चालली असून गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण महिला वळल्या पुन्हा सरपणाकडे
पांढरकवडा : सध्या सिलिंडरच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हे वाढलेले दर ग्रामीण भागात परवडत नसल्याने इंधनाची सोय म्हणून ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा सरपण गोळा करण्याकडे वळल्या असल्याचे दिसून येत आहे. शेतशिवार व जंगलामधून महिला सरपण गोळा करीत असल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहायला मिळते.
वणी उपविभागात पावसाची हजेरी
वणी : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने दोन दिवसांपासून अधूनमधून उपविभागात हजेरी लावणे सुरू केले आहे. त्यामुळे वातावरणातही मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास वणी शहरात जवळपास १५ मिनिटे पाऊस कोसळला. तसेच शनिवारी रात्रीच्या सुमारासही वणी परिसरात पावसाने हजेरी लावली होती.