ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : व्यावसायिक सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक चहा टपरीधारकांनी घरगुती सिलिंडरचा वापर सुरू केला आहे. या प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरासह तालुक्यात अनेक बेरोजगारांसह काहींनी चहा टपरीची दुकाने थाटली आहे. यातून त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. मात्र वाढत्या महागाईमुळे चहा टपरी आणि हाॅटेलमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणे कठीण झाले आहे. त्यावर मात म्हणून बहुतांश व्यावसायिकांनी घरातील सिलिंडर काढून चहा टपरीत लावले आहे. घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरणे गुन्हा आहे. मात्र पुरवठा विभाग उदासीन असल्याने कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर सुरू ठेवला आहे. आता त्याचेही दर वाढले आहे. मात्र काही प्रमाणात यात पैशांची बचत होत आहे.
व्यावसायिक २४७९ ला, घरगुती १०४८ ला- व्यावसायिक सिलिंडरचे दर दोन हजार ४७९ तर घरगुती सिलिंडरचे दर एक हजार ४८ रुपयांवर पोहोचले आहे.- तालुक्यातील व्यावसायिकांकडे ११८ सिलिंडर आहे. त्यापैकी ३७ महागाव शहरात आहे.
व्यावसायिक सिलिंडरचा वापर २० टक्क्यांनी घटलाव्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने जवळपास २० टक्क्यांनी त्यांचा वापर घटला आहे. त्याऐवजी व्यावसायिक घरगुती सिलिंडर वापरताना दिसत आहे. यामुळे त्यांना काही प्रमाणात लाभ होत आहे.
कारवाई कोण करणार?
घरगुती सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक कारणासाठी वापर होत असताना पुरवठा विभाग उदासीन आहे. हा विभाग कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे व्यावसायिक बिनदिक्कत घरगुती सिलिंडरचा वापर करतात.
‘लोकमत’ने काय पाहिले?
बसस्थानक परिसर बसस्थानक परिसरात अनेक चहा टपऱ्या आहेत. त्यापैकी काहींमध्ये घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात होता. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने अनेकांनी घरगुती सिलिंडर टपरीवर लावले आहे.
तहसील परिसर तहसील परिसरातीलही बहुतांश चहा टपऱ्यांमध्ये घरगुती सिलिंडर लावल्याचे दिसून आले. व्यावसायिक लपून-छपून या सिलिंडरचा वापर करतात. छोटे हाॅटेल व्यावसायिकही घरगुती सिलिंडरच वापरतात.
...तर होऊ शकतो गुन्हा दाखलघरगुती सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी उपयाेगात आणता येत नाही. या प्रकरणी तक्रार झाल्यास किंवा पुरवठा विभागाला माहिती पडल्यास संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल होऊ शकतो.