बुधवारी उमरखेडमध्ये प्रारंभ : पणन महासंघाला केवळ आठ हजार क्विंटल यवतमाळ : खासगी व्यापाऱ्यांनी पडलेल्या दरात जिल्ह्यात चार लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. ही कापूस खरेदी १६० कोटींच्या घरात आहे. या स्पर्धेत पणन महासंघाला केवळ आठ हजार क्विंटल कापूस मिळाला आहे. बुधवारी उमरखेडमध्ये कापूस खरेदीचा प्रारंभ होणार आहे. पणन महासंघाने व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत कापसाची खरेदी सुरू केली. ही खरेदी सुरू होताच व्यापाऱ्यांनी कापसाचे खासगी दर कमी केले आहे. जिल्ह्यात पणनची केवळ तीन केंद्र आहेत. त्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी चार लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. तर पणन महासंघाने तीन संकलन केंद्रांवर केवळ आठ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. याची किंमत ३ कोटी २० लाख रूपयांच्या घरात आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात १६० कोटींची कापूस खरेदी
By admin | Published: November 18, 2015 2:35 AM