शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

नाफेडकडून तुरीची थेट खरेदी

By admin | Published: January 02, 2016 8:36 AM

तुरीला चांगले दर मिळावे, दलालांची अरेरावी थांबावी आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला लगाम बसावा म्हणून केंद्र शासनाने

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ तुरीला चांगले दर मिळावे, दलालांची अरेरावी थांबावी आणि व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला लगाम बसावा म्हणून केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नववर्षारंभापासून नाफेडने तुरीची थेट खरेदी सुरू केली आहे. यासाठी यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. या केंद्रावर तुरीला ९५०० रूपये क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला.सध्या खुल्या बाजारात तुरीची खरेदी करताना ७००० रूपये क्विंटलपासून होत आहे. खुल्या बाजारात अधिकतम दर ९००० रूपयांपर्यंत पोहोचले आहेत. नाफेडने उच्चतम दराने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे किमान दर त्या ठिकाणी नाही. यामध्ये सध्या २५०० रूपयांचा फरक आहे. गतवर्षी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची साठेबाजी केली. त्यामुळे तूरडाळीचे दर वधारले. यावर्षी तुरीचे उत्पादन घटले. पुढील काळात तुरीची साठेबाजी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा प्रकार हाणून पाडण्यासाठी राज्याने तुरीची आयात केली. मात्र उत्पादन कमी असल्याने पुरेशी तूरडाळ मिळाली नाही. महागाई नियंत्रित करण्यासोबत शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावे म्हणून नाफेडने पाऊल उचलले आहे. चांगल्या प्रतिचा माल नाफेड खरेदी करणार आहे. या प्रक्रियेत दलाल राहणार नाही. यामुळे शेतमालाचे संपूर्ण दर शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. सध्या नाफेडने ९५०० रूपये क्विंटले तुरीची थेट खरेदी केली आहे. यामध्ये दररोज जो भाव केंद्र जाहीर करेल, त्यानुसार खरेदी होणार आहे. दलाली न घेता ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांकडे वळती होणार आहे. खुल्या बाजारात जे दर सुरू आहेत, त्यानुसारच तुरीची खरेदी होणार आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधाने गोंधळाची स्थिती४प्रारंभी खुल्या बाजारातून तूर खरेदी करण्याचे धोरण नाफेडने ठरवले. त्यानुसार नाफेडच्या प्रतिनिधीने बैठक घेतली. थेट खरेदीचा मुद्दा मांडला. मात्र याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यामुळे पहिल्या दिवशी तूर खरेदी करताना गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नाफेडच्या तूर खरेदीसाठी स्वतंत्र गाळा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना नाफेडला तूर द्यायची, त्यांनी या ठिकाणी तूर दाखवायची. ती खरेदी होणार आहे. असे आहेत निकष४तूर खरेदी करताना त्यात ओलावा नसावा असा प्राथमिक निकष आहे. साधारणत: १२ टक्केपर्यंत ओलावा असणारी तूर हे केंद्र खरेदी करणार आहे. अधिक काडी कचरा नसावा. खरेदी झालेल्या तुरीचे पैसे ३ ते ४ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. ४केंद्र शासनाने नाफेडच्या तूर खरेदीत यवतमाळ, अकोला, अमरावती, खामगाव, मलकापूर आणि हिंगणघाटचा समावेश केला आहे. या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.