शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मंत्रिपदाचे चेहरे ‘चेंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते.

ठळक मुद्देसत्ता बदल : संजय राठोड निश्चित, इंद्रनील नाईकांनाही संधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील सत्तेचे समीकरण बदलताच जिल्ह्यात मंत्रिपदाचे संभाव्य चेहरेही बदलण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेनाऐवजी आता शिवसेना-राष्ट्रवादी असे नवे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातून शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु राज्यात सत्तेचे चक्र फिरले आणि सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. राज्यात आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळण्याची चिन्हे आहेत. त्यांना काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या घडामोडीत शिवसेनेला १४५ आमदारांच्या समर्थनाचे पत्र वेळेत राज्यपालांकडे सादर करता आले नाही. त्यांची वेळ संपली असली तरी राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. त्यामुळे आता पुढे हे ठरलेले समीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.नव्या समीकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के आहे. उलट त्यांना कॅबिनेटपदावर बढती मिळण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, पुसदमधील नाईक बंगल्याचे नव्या पिढीचे वारसदार व पहिल्यांदाच निवडून आलेले इंद्रनील मनोहरराव नाईक ही दोन नावे प्रामुख्याने पुढे आहेत. ख्वाजा बेग यांचा आमदारकीचा अवघा वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांना मंत्रिपदावर संधी दिली जाईल की नाही, याबाबत राजकीय गोटात साशंकता आहे. परंतु इंद्रनील नाईक यांना मात्र नवा चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रा.तानाजी सावंत यांचा विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळशी आता तेवढा संबंध राहिला नसला तरी नव्या सरकारमध्ये त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असल्याने ते सत्तेचे ‘लाभार्थी’ होणार नाही. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. मात्र एकाने अलिकडेच सेनेशी घरठाव केल्याने त्यांची काँग्रेसकडून संधी तशीही हुकल्याचे मानले जाते.जिल्हा परिषदेतही सत्तेचे समीकरण बदलणार ?जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेस - शिवसेना व भाजप असे सत्तेचे समीकरण आहे. नव्या टर्ममध्ये भाजपला बाहेर ठेवून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेचे गणित मांडणार काय, याकडे नजरा लागल्या आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना सत्तेत आहे. राज्यातील बदललेले समीकरण पाहता जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भाजपला विरोधी बाकावर बसविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळविले जाईल का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.यवतमाळ पॅटर्न राज्यातयवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळूनही भाजप-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अभद्र खेळीमुळे दोन वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले होते. सहा महिन्यांपूर्वी ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजप-सेना व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण मांडले गेले. हाच पॅटर्न राज्यात विधानसभेसाठी पाहायला मिळाला. भाजपने सर्वाधिक १०५ जागा मिळवूनही शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खेळीमुळे भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण