लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : युती शासनाचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या नेत्यांनीही या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविल्याची माहिती राजकीय गोटातून पुढे येत आहे.काँग्रेस आघाडी सरकारमध्ये एकाच वेळी चार ते पाच लालदिवे पाहिलेल्या यवतमाळ जिल्ह्याला युती सरकारमध्ये सुरुवातीला एक व अलिकडे दोन लालदिव्यांवर (मंत्रीपदांवर) समाधान मानावे लागले. भाजपाचे मदन येरावार व शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे ही राज्यमंत्रीपदे आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली जावी, अशी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा वजा मागणी आहे. या दोनही मंत्र्यांचे अनेक ‘मायनस पॉर्इंट’ असले तरी बढती मिळावी या दृष्टीने प्रामाणिक कार्यकर्ते मात्र त्यांच्या केवळ ‘प्लस पॉर्इंट’चीच चर्चा करताना दिसत आहेत.येरावार ‘सीएम’च्या ‘गुडबुक’मध्येना. येरावार हे गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्याही ‘गुडबुक’मध्ये आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे वजनदार खात्यांची जबाबदारी सोपविली गेली. जिल्ह्यात भाजपाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.संघटन कौशल्य दाखविलेजिल्हा परिषद, नगरपरिषदा काबीज करून त्यांनी आपल्यातील संघटन कौशल्य दाखवून दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांची ताकद आणखी वाढल्याचे मानले जाते. अशा अनेक पैलूंमुळेच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.शिवसेनेची भाजपाशी एकाकी झुंजशिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सेनेचे विदर्भातील एकमेव मंत्री आहे. त्यांनी जिल्हा शिवसेनेवर आपली पकड मजबूत केली आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच भाजपाचे आमदार असताना ना. राठोड त्यांच्याशी एकाकी राजकीय झुंज देत आहेत. या पाच आमदारांना चित करून ना. राठोड यांनी जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आणले आहे. यवतमाळच्या नगराध्यक्षपदी सेनेचा उमेदवार निवडून आणला. त्यांना काहीसा पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असला तरी ‘भाऊ, अशा क्षुल्लक विरोधाला पुरुन उरतात’ अशी त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची भावना आहे.रावतेंच्या विदर्भ नियुक्तीचा फायदाना. संजय राठोड हे शिवसेना नेते ना. दिवाकर रावते यांचे विश्वासू मानले जातात. त्यातच आता ना. रावतेंकडे संपूर्ण विदर्भाची संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली गेल्याने राठोडांचे वजन आणखी वाढल्याचे मानले जाते.थेट ‘मातोश्री’वर संपर्कना. राठोड स्वत:ही थेट ‘मातोश्री’वर सातत्याने संपर्कात असतात. या सर्व जमेच्या बाजू असल्याने ना. राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची दाट शक्यता शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे. या संभाव्य कॅबिनेट मंत्रीपदाच्या जोरावर ना. राठोड यांनी किमान पश्चिम विदर्भाचे तरी शिवसेनेचे नेते बनावे, ही सामान्य कार्यकर्त्यांची रास्त अपेक्षा आहे.राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावरील बढतीचे वेध लागले आहे. त्यात कुणाला यश येते हे वेळच सांगणार आहे.तानाजी सावंतांचीही मंत्रिपदासाठी फिल्डींगतिकडे जिल्ह्यातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून फिल्डींग लावल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांचे हे मंत्रीपद उस्मानाबाद जिल्ह्याच्या कोट्यात जाणार असल्याने ना. राठोड यांच्या बढतीला कोणताही धोका नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहे. या बढतीच्या निमित्ताने या नेत्यांच्या ‘प्लस पॉर्इंट’ची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होताना दिसते आहे.
दोन्ही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट बढतीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:21 PM
युती शासनाचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठळक मुद्देनोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते मांडत आहेत नेत्यांचे ‘प्लस पॉर्इंट’