लोकमत न्यूज नेटवर्कनेर (यवतमाळ) : अनेक दिग्गज संगीतकारांसमवेत शेकडो गाणी गायलेल्या पुष्पा पागधरे या परिस्थितीपुढे हतबल झाल्या आहेत. डोक्यावर हक्काचे छप्पर नसल्याने शासनाकडे घराची त्यांनी मागणी केली आहे. पण अद्याप शासनाने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही.नेर येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तिथे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे १५ मार्च १९४३ रोजी पुष्पातार्इंचा जन्म झाला. चंद्रकांत पागधरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडील भजन गायचे. त्यामुळे त्यांनाही गाण्याचा छंद लागला. आर. डी. बेंद्रे यांनी पुष्पातार्इंना विनामूल्य संगीत शिकविले. मात्र, गायनासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या पागधरे यांना स्वत:चे घर बनविता आले नाही. उतारवयात त्यांनी शासनाकडे घराची मागणी केली. पण शासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्यावर फुटपाथवर राहण्याची वेळ आली असती. उल्हासनगरातील मानलेल्या भावाने आपल्या घरात पुष्पातार्इंना आसरा दिला.
गायिका पुष्पा पागधरे यांची घरासाठी शासनाला हाक
By admin | Published: July 17, 2017 1:57 AM