शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

आईला फोन करून डोहात उतरला, मृतदेहच हाती आला

By सुरेंद्र राऊत | Updated: August 11, 2024 19:07 IST

किटा कापरातील डोहात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे बचावले

यवतमाळ: शहरालगतच्या चौसाळा टेकडी परिसरातील किटा कापरा शिवारात गिट्टी खदान जवळ पाण्याच्या प्रवाहाने धबधबा तयार झाला आहे. या ठिकाणी अनेकजण पावसाळ्यात मौजमस्तीसाठी जातात. रविवार सुटीचा दिवस असल्याने बालाजी सोसायटी महादेवनगर परिसरातील चार मित्र या धबधब्यावर पोहोचले. तेथे गेल्यानंतर तिघांना पोहोण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यातील एकाने आपल्या आईला फोन करून याची माहिती दिली. व नंतर डोहात उडी घेतली. मात्र तो यातून बाहेर आलाच नाही. त्याचा मृतदेहच हाती लागला.

श्याम सुनील जोशी (१६) रा. महादेवनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. श्याम हा त्याच्या इतर तीन मित्रांसोबत किटा कापरा येथील धबधब्यावर पोहोचला. त्याच्यासोबत ऋषिकेश मनोज गडीकर, पार्थ याेगेश भांदककर व मंदार बोरकर होते. चौघेही धबधब्यावर आनंद लुटत असताना अचानक त्यांना धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहोण्याचा मोह झाला. ऋषिकेश याला पोहणे नसल्याने तो काठावरच बसून राहिला. पार्थ, मंदार व श्याम तिघे पाण्यात उतरले. पाणी खोल असल्याने त्यांना अंदाज आला नाही. तिघेही गटांगळ्या खाऊ लागले.

पार्थ व मंदार कसे तरी बाहेर पडले. श्यामला यातून निघता आले नाही. मित्रांच्या समक्षच तो पाण्यात बुडाला. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तातडीने मदतीची याचना करण्यात आली. रविवार असल्याने हा परिसर गजबजलेलाच होता. धावपळ सुरू झाली. साधन नसल्याने तातडीने श्यामला पाण्याबाहेर काढता आले नाही. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिस व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना मिळाली. त्यांनी लगेच आपत्ती निवारण कक्षाचे पथक घटनास्थळी पाठविले. या पथकानेही तब्बल तीन तास श्यामचा पाण्यात शोध घेतला. त्यांना मृतदेह मिळाला नाही.कापरा येथील युवकाने शोधला मृतदेहअखेर किटा कापरा येथील प्रदीप प्रल्हाद बोरकर हा धाडसी तरुण मदतीला पुढे आला. त्याने स्वत: डोहात उडी घेऊन शोधकार्य सुरू केले. जे प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन पथकाला जमले नाही, ते काम गावच्या धाडसी युवकाने केले. श्यामचा मृतदेह दुपारी ४ वाजता पाण्याबाहेर काढण्यात यश आले.पावसाळी पर्यटन जीवावर बेतणारेयवतमाळ शहरालगत अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत. अशा ठिकाणी गेल्यानंतर जीव धोक्यात घालण्याचे धाडस केले जाते. काहींना रिल्स तयार करायची असते तर काहींंना फोटो घ्यायचे असतात. या नादात आपण जीवाशी खेळतोय याचेसुद्धा भान राहत नाही. धबधबे, प्रकल्प, नदी-नाले येथे तयार झालेले डोह अशा ठिकाणी स्वत:ला सुरक्षित ठेऊनच आनंद घेतलेला कधीही सुखदायी ठरतो. अन्यथा कुटुंबाचे मोठे नुकसान होते.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू