लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मजूर कामाच्या शोधात हैदराबादमध्ये पोहोचले. गत नऊ महिन्यापासून त्याच ठिकाणी असलेल्या मजुरांना तेलंगणा सरकारने रविवारी परतीचा पास दिला. हे मजूर हैदराबादवरून यवतमाळात आले. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले.जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले. या मजुरांकडे पिण्याचे पाणी नाही. भोजनाची व्यवस्था नाही. खिशात पैसे नाही अशा स्थितीत भर उन्हात हे मजूर बसस्थानक चौकात एसटीमध्येच बसून होते. त्यांना वाहक आणि चालकाकडून शासकीय प्रक्रिया पार पाडत आहे, त्यामुळे थांबाव लागणार असेच उत्तर ऐकायला मिळत होते. परराज्यातून आलेले हे मजूर राज्यात पाठविताना प्रथम आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यासोबतच वाहनाला सॅनिटराईज करावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी ही बस थांबली आहे. या प्रकारामुळे संतप्त मजुरांनी आम्हाला किमान पाणी द्या आणि नंतर गावी पाठवा, असे म्हणत धिम्या गतीचा निषेध नोंदविला. समीर चेटुले, दशरथ देवकर, सतीश शेळके, अजय ढवळे, तन्मय किनाके, सतीश शेळके यांनी मजुरांनी त्वरित आपल्या गावी पाठवावे, असे मत नोंदविले.पुढचा प्रवास उधारीवरमजुरांना घेऊन बस यवतमाळात पोहोचली. मात्र पाच तास झाल्यानंतरही पुढे जाण्यासाठी सूचना मिळाल्या नाही. अखेर हे मजूर पायदळ गावाकडे निघाले. त्यांना एका ठिकाणावरून उधारीवर ऑटोरिक्षा मिळाला. प्रवाशांना पुढे नेण्याकरिता एसटीची मर्यादा संपली. यामुळे चंद्रपूर आगाराच्या वाहक आणि चालकांनी गाडी पुढे नेण्याकरिता मनाई केली. पाच तास ही गाडी रेंगाळली. मात्र मजुरांची आरोग्य तपासणी झाली नाही. अखेर बस चालकांनी चौकात थांबलेली गाडी बसस्थानकात नेली. तेथून ही बस चंद्रपूरला गेली. काही मजूर पायी गेले. तर काही उधारीवर ऑटोरिक्षा मिळवून आपल्या गावाकडे गेले. मजुरांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले.
ठळक मुद्देटळटळीत उन्हात मजुरांचा पाच तास बसमध्येच ठिय्या : चंद्रपूर आगाराच्या बसची मर्यादा यवतमाळात संपली