शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:34 PM

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवृक्षप्रेमींचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात १०० रोपट्यांची लागवड, शहराची आंबानगरीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरातील काही वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून कडूनिंब, वड, पिंपळासोबतच एक हजार केशर आंब्याची लागवड करून ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना अंमालात आणली. शहराला आंबानगरीचे वैभव प्राप्त करण्यासाठी शेकडो आर्णीकर धडपडत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वस्तिक जिनिंग, खासगी बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, केमिस्ट अँड ड्रगीस्ट, डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त पुढाकारातून रविवारी १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.वातावरणात होणारा बदल बघून वृक्ष लागवडीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन शहरात लोक सहभागातून एक हजार आम्रवृक्ष लागवडीचा संकल्प केला. याकरिता आर्णी आम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. यातूनच रविवारी सकाळी १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपणाला आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, डॉ.शीतलकुमार गटागट, मुख्याधिकारी माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कार, दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल, आरएफओ रोडगे, मंडळ अधिकारी नाईक, नगरसेवक चिराग शहा, प्रकाश पांडे, नंदकिशोर राठी, मनोज गंगन, प्रफुल वानखडे, अशोक अग्रवाल यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे कार्य आर्णीत उत्तरोत्तर वाढून आर्णीचे नाव ‘आंबा नगरी: म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उदयास यावे, असे मत डॉ.गटागट यांनी व्यक्त केले.जावयाची पाहुणचारासाठी अशीही अटजावई म्हटलं की सन्मान आलाच. उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे पाहुणचाराची पर्वणी. रसाळीच्या मेजवाणीत जावयाची खास खिदमत केली जाते.मात्र येथील कोठारी परिवाराच्या जावयाने १०० रोपटी लावणार असेल, तरच सासुरवाडीला रसाळीसाठी येईल, अशी अनोखी अट घातली. डॉ.शीतलकुमार गटागट असे या जावई बापूचे नाव आहे. ते लातूर येथे वास्तव्याला असतात. डॉक्टरांना लातूरच्या दुष्काळी भागाची दाहकता माहिती आहे. त्यामुळेच ते पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा संदेश देत या मोहिमेत सहभागी झाले. त्यांची अट मान्य करून येथील कोठारी परिवाराने त्यांना १०० रोपटी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे डॉ.गटागट यांच्या उपस्थितीतच १०० रोपांची लागवड करण्यात आली.