सत्र २०१६-१७ : चार विद्यार्थी बेंगळुरुच्या नामांकित कंपनीतयवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सत्र २०१६-१७ साठी कॅम्पस सिझनची सुरुवात झाली आहे. महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या इन कॅम्पस ड्राईव्हमधून चार विद्यार्थ्यांची बेंगलोर येथील रिठीस डिजीटल मीडिया या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.यामध्ये अंतिम वर्ष कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतील स्वप्नील वरारकर, काजोल छाबडा, आसावरी दुधे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील नयना जयस्वाल यांचा समावेश आहे. त्यांना कंपनीच्या बेंगलोर येथील कार्यालयात जीएसएम नेटवर्क इंजिनिअर या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. दोन लाख ४० हजार रुपये प्रती वर्ष एवढे पॅकेज त्यांना जाहीर करण्यात आले आहे. अॅप्टीट्युड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्यांमध्ये यशस्वी होत या विद्यार्थ्यांची कंपनीत निवड झाली. त्यांना महाविद्यालयाचे टी अँड पी आॅफिसर प्रा. राहुल फाळके, प्रा. अतुल शिंगाडे, प्रा. ओंकार चांदुरे, प्रा. डी.डी. शिरभाते, मनोज शेंदरे, हेमंत खंडारे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’मध्ये कॅम्पस सिझन सुरू
By admin | Published: September 05, 2016 12:57 AM