लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने घातलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्या, या मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी यवतमाळसह, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलनात सहभागी झाले होते. आमदार नागो गाणार यांनीही मार्गदर्शन केले. २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयात शाळासिद्धीप्रमाणे शाळा ए ग्रेडमध्येच असावी, तसेच इयत्ता ९ व १० चा निकाल ८० टक्केपेक्षा जास्तच असावा, अशा प्रकारची जाचक अट टाकण्यात आली आहे. निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी एससीईआरटीकडे असताना गेल्या एक वर्षापासून प्रशिक्षणाचे आयोजन केलेले नाही. ६ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार, कायम विनानुदानित सेवा ही वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. या जाचक अटी त्वरित रद्द कराव्या, कायम विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी, शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतरची आश्वासित प्रगत योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी अशोक पोले, निलय बोंडे, विकास दिवे, वसंत अरदळे, प्रकाश हरणे, विनोद पाचडे, दिनेश धोटे, प्रथम काळे, उमेद डोंगरे, मिलिंद राठोड, पंडितराव मस्के, रितेश खुळसम, संजय कातडे, दिगंबर करडे, अशोक माहुलकर, शिवानंद दुधेवार, देविदास काळपांडे, उपेंद्र पाटील, सचिन अंजीकर, गोपाल चव्हाण, प्रदीप शिंदे, प्रल्हाद कामाले आदी उपस्थित होते.
निवड श्रेणीच्या जाचक अटी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:17 PM
शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने घातलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्या, या मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देशिक्षण संघर्ष संघटना : उपसंचालक कार्यालयापुढे धरणे आंदोलन