शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खासदार, आमदारांचे पेन्शन रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता अशा मुद्द्यांवर सरकारचे मन वळविण्यासाठी कर्मचाºयांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी यवतमाळात संपकºयांच्या मोर्चाने ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा संप : वेतन आयोग, महागाई भत्ता, जुनी पेन्शन गाजली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता अशा मुद्द्यांवर सरकारचे मन वळविण्यासाठी कर्मचाºयांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी यवतमाळात संपकºयांच्या मोर्चाने लक्ष वेधले.मोर्चानंतर तिरंगा चौकात सभा झाली. संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संपात ४१ संघटनांचे २२ हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. राज्य शासनाने आॅक्टोबरपर्यंत प्रश्न न सोडविल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य समन्वय समितीचे निमंत्रक रवींद्र देशमुख यांनी सभेत दिला.आंदोलनाचे नेतृत्व राज्य समन्वय समितीचे निमंत्रक रवींद्र देशमुख यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणीस नंदू बुटे, नवीन पटेल, ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, नरेशचंद्र काठोळे, दिगांबर जगताप, आशीष जयसिंगपुरे, किशोर पोहणकर, श्रीरंग रेकलवार, सुरेश मदनकर, अजय मिश्रा, सु.म. गिरीे, राजू मानकर उपस्थित होते.नर्सेस, स्वीपर संपावर ‘मेडिकल’मध्ये रुग्णांचे हालयवतमाळ : संपाचा परिणाम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिसून आला. नर्सेस आणि स्वीपर कामावर नसल्याने येथील रुग्णसेवेचा डोल्हाराच कोलमडला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांची मदत घेऊन रुग्णांवर औषधोपचार सुरू केला. मात्र पर्यायी व्यवस्था तुटपुंजी ठरत असल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागला. वैद्यकीय महाविद्यालयात दिवसाला दीड ते दोन हजार रुग्ण येतात. यातील ३० टक्के रुग्ण दाखल होतात. संपूर्ण विभाग आणि वॉर्डात सुश्रुशा करण्याची जबाबदारी असलेल्या नर्सेसच संपावर असल्याने मोठा पेच निर्माण झाला. शिवाय रुग्णांना स्ट्रेचरवरून ने-आण करणारे इतर सुविधा देणारे, वॉर्डातील स्वच्छतेसाठी झटणारे कक्ष सेवक आणि सफाई कामगार संपावर असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने दक्षता म्हणून सर्व वॉर्डातील सफाई कामे सोमवारीच करून घेतली. मात्र हा संप आणखी दोन दिवस चालणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ओपीडीमध्ये औषधी वितरण कक्षात कर्मचारीच नसल्याने रुग्णांची रांगच रांग लागली होती. स्वत: अधिष्ठातांनी येथे अतिरिक्त डॉक्टरांना बसवून औषधी वितरण करून घेतले. पर्यायी व्यवस्था म्हणून यवतमाळातील खासगी नर्सिंग महाविद्यालयातील ८० विद्यार्थी वॉर्डात नियुक्त केले. त्यांच्यासोबत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर, आंतरवासिता करणारे डॉक्टर, निवासी डॉक्टर यांना कामाला लावले आहे.अर्धे शिक्षक शाळेतचसंपात बहुतांश शिक्षक संघटनांनी सहभागी असल्याचे जाहीर केले. मात्र मंगळवारी ४० टक्के शिक्षक शाळेतच होते. कास्ट्राईब आणि प्राथमिक शिक्षक संघाने संपातून फारकत घेतली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या आठ हजार शिक्षकांपैकी केवळ ८८१ जणच सहभागी झाल्याचा दावा शिक्षणाधिकाºयांनी केला. दरम्यान, जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाºयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यात विजयसिंग सूर्यवंशी, अरुण खरमोटे, बलराज मगर, विवेक लिंगराज, शरद भिडे, बाबूराव पुजरवाड, सुदाम पांगुळ, दीपक जोशी, संतोष नेवारे, अशोक जयसिंपुरे, एम.पाटील, दिलीप फुटाणे, बी.एफ. बैनाडे, प्रमिला कुंभारे उपस्थित होते.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपMorchaमोर्चा