लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे. यामुळे बेरोजगारांना या पदभरतीचा फायदा घेता येणार नाही. या दोन्ही पदासाठी लावलेल्या जाचट अटी तत्काळ रद्द कराव्यात, ही मागणीत घेऊन प्रहार विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी धडक दिली.आदिवासी विकास विभागाकडून नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागातील गृहपाल व अधीक्षकांची पद भरण्यात येत आहे. यासाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुभव प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अधीक्षक पदासाठी १०० गुणांची तर गृहपाल पदासाठी २० गुणांची परीक्षा घेण्यात यावी, दोन्ही पदाच्या परीक्षा एका दिवसी न घेतात वेगवेगळ््या घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या प्रहार विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी, प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख रवी राऊत, समाजकार्यचे विद्यार्थी आकाश पाटील, मंगेश मानकर, अमीर तुराळे, मोरेश्वर कोडापे, प्रवीण काळे, प्रमोद नाटकर, बाळासाहेब राऊत, प्रकाश घोटेकार, जगदीश पवार, विजय जाधव, दशरथ शिंदे, नितीन कोल्हे, आदित्य मोरे, विकास चव्हाण, निखील कदम, शुभम जाधव, भाविक भगत, गिता उरवते, सोनल फुलमाळी, किरण गोसावी, प्रियंका कालमोरे, अपूर्वा शिंदे, हितेश जाधव, आकाश चिंचोलकर आदी उपस्थित होते.
अधीक्षक, गृहपाल पदाचे जाचक निकष रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:04 AM
आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे.
ठळक मुद्देप्रहार संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक, बेरोजगारांवर अन्याय