आॅनलाईन लोकमतराळेगाव : तालुक्यातील १८ गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मागील दीड वर्षापासून या गावातील नागरिक भितीच्या वावरत आहे. घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून अनेकांनी शेतशिवाराची कामे सोडून दिली आहे. वाघाच्या दहशतीने रोजगारासाठी ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागत आहे.वाघाने आतापर्यंत ९ जणांचा बळी घेतला असून त्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. वनविभागाकडून मदत देण्यासाठी अनेक निकष लावले जातात. एकीकडे वाघामुळे रोजगार हिरावला आहे तर दूसरीकडे वनविभागाची यंत्रणा दीड वर्षापासून केवळ वाघाचा शोध घेण्यातच व्यस्त आहे. सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ केली जात आहे. वाघामुळे जगणेच धोक्यात आल्याने तेथे जनक्षोभ उसळला होता. गजानन शामराव पवार यांचा २३ आॅगस्ट रोजी वाघाने फर्शा पाडला. त्यानंतर सतीश पांडूरंग कोवे या युवकाचा १७ सप्टेबरला बळी घेतला. यामुळे संतापलेल्या सखी येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांचे शासकीय वाहन पेटवून दिले होते. त्यानंतरही प्रशासकीय यंत्रणा ताळ्यावर आलेली नाही. प्रत्येकवेळी भयग्रस्त ग्रामस्थांची खोटे आश्वासन देवून भालवण केली जाते. वाघ पकडण्यासाठी अजून पर्यंत कोणतेच यश आलेले नाही. आतापर्यंत ९ जणांचा हकनाक बळी गेला आहे. वनविभागाची यंत्रणा शनिवार, रविवारच्या सुट्या घेवून गायब होते. शासकीय कामकाजा प्रमाणे या वाघाचा शोध घेतला जात आहे. कुणीही उच्च पदस्थ अधिकारी या भागात वेळेवर भेट देण्यास येत नाही. याचा असंतोष ग्रामस्थांमध्ये खदखदत आहे.जनक्षोभ उसळल्यानंतर वनविभागाने पाच पथके वाघाचा शोध घेण्यासाठी जंगलात तैनात केली आहे. शंभरावर कर्मचारी वाघाचा माग काढण्यास गुंतले आहे. अनेक ठिकाणी मचानी बांधण्यात आलेल्या आहे. ६० ट्रॅप कॅमेरे लाऊन निगरानी केली जात आहे. एक महिना शोध मोहिम राहून तीन पथके परत पाठविण्यात आली होती. आता हैद्राबादच्या खाजगी शुटरला पाचारण केल्याने नेमके काय होते याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील १८ गावांमधील जनजीवन उद्धस्त झाले आहे.यांची झाली शिकारसोनाबाई वामन घोसले (सराटी), सखाराम लक्ष्मण टेकाम (झोटींगधरा), मारोती विठोबा नागोसे (खैरगाव कासार), प्रवीण पुंडलिक सोनोने (तेजनी), गजानन शामराव पवार (सराटी), सतीश पांडुरंग कोवे (सखी), चेंडकू भोनू फुटकी (विहीरगाव) यांचा नरभक्षक वाघाने बळी घेतला आहे. त्याशिवाय कळंब व तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नरभक्षक वाघाची १८ गावांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 9:47 PM
तालुक्यातील १८ गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मागील दीड वर्षापासून या गावातील नागरिक भितीच्या वावरत आहे.
ठळक मुद्देकामकाज ठप्प : घराबाहेर निघणेही झाले कठीण