लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जाजू ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मोहीत प्रसन्नकुमार सुराणा याने बारावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविले. आता मोहीतला सीए व्हायचे आहे. तो पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण करणार आहे. भविष्यात सामाजिक कार्यातही सहभाग घ्यायचा असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.बारावीच्या परीक्षेत मोहितने ९३.०७ टक्के गुण प्राप्त केले. वाणीज्य शाखेतून त्याने ही परीक्षा दिली. त्याला अकाउंट विषयाची सर्वाधिक आवड आहे. हिंदी विषयात त्याला सर्वाधिक ९७ गुण मिळाले. मोहीतने यवतमाळ पब्लिक स्कूलमधून (वायपीएस) दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीत त्याने ९४ टक्के गुण प्राप्त केले होते.अभ्यासातील सातत्य आणि विषय समजून घेणे, त्यानंतर त्याचे विश्लेषण करणे यावर मोहीतने भर दिला. त्यामुळेच चांगले गुण मिळविणे शक्य झाल्याचे त्याने सांगितले. अधिक वेळ अभ्यास करण्यापेक्षा कमी वेळात जादा अभ्यास करणे शक्य असल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र त्यासाठी मनाची एकाग्रता महत्वाची असून त्याच सूत्राने आपण यश प्राप्त केल्याचेही मोहीतने सांगितले.मोहीतला वाचनापेक्षा लिखानाची जादा आवड आहे. कविता लिहीणे, सुविचार लिहीण्याची त्याला आवड आहे. भविष्यात मोहीतला सामाजिक विषयांवर पुस्तक लिहायचे आहे. सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या तरूणाचा एक ग्रुप बनवून सहभाग घ्यायचा आहे. बॅडमिंटन व क्रिकेट हे मोहीतचे आवडीचे खेळ आहे. त्याची बहीण प्राची हीसुद्धा बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आली होती.मोहीतचे आजोबा महेंद्र सुराणा भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य आहे. ते येथील आर.के. एजंसीचे संचालक आहे. मोहीतचे वडील व्यवसाय करतात. आई आणि आजी गृहिणी आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरूजनांसोबत कुटुंबियांना दिले.
मोहितला व्हायचेय सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 9:30 PM
येथील जाजू ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मोहीत प्रसन्नकुमार सुराणा याने बारावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविले. आता मोहीतला सीए व्हायचे आहे. तो पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण करणार आहे. भविष्यात सामाजिक कार्यातही सहभाग घ्यायचा असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.
ठळक मुद्देजिल्ह्यात अव्वल : वाणिज्य शाखेचा विद्यार्थी