लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी बाजी मारली. जिल्ह्यात महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी कविश आनंद पांडे ५०० पैकी ४९३ गुण (९८.६० टक्के) घेऊन जिल्ह्यात अव्वल राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी अनुक्रमे कनिष्का प्रशांत गाडे (९८.२० टक्के), निधी मनोज जाधव (९८ टक्के) यांनी बाजी मारली. पुसद येथील जेट किड्सचा विद्यार्थी प्रथमेश नितीन पामपट्टीवार हासुद्धा ९८ टक्के गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे राहिला.कनिष्का गाडे ही विद्यार्थिनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधून पहिला तर जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलने आपली शंभर टक्के यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ टक्के, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा निकाल ९८ टक्के लागला. घाटंजी तालुक्याच्या बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे.पोदार इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी विक्रमादित्य बजाज ९७.६० टक्के गुणांसह शाळेतून पहिला राहिला. स्कूल ऑफ स्कॉलर्समधील गौतमी देशमुख ९७.०८ टक्क्यासह शाळेतून अव्वल राहिली.दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी आपला ठसा उमटवित टक्केवारीत आघाडी घेतली आहे. सीबीएसई दहावीचा निकाल येणार असल्याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांमध्ये होती. जिल्ह्यात २ वाजतानंतर संचारबंदी असल्याने पालकांनी ऑनलाईनच निकाल मिळविण्याची धडपड केली. शाळांनीसुद्धा टॉपर विद्यार्थ्यांची यादी काढून गोड बातमी पालकांना दिली.कविशला व्हायचेयं संगणक अभियंतासीबीएसई दहावीत जिल्ह्यातील टॉपर कविश पांडे हा उमरसरातील छत्रपतीनगर येथील रहिवासी आहे. त्याला संगणक अभियंता व्हायचे आहेत. मात्र हे शिक्षण त्याला यवतमाळातच घ्यायचे आहे. तो दररोज चार तास अभ्यास करायचा. आपले कुटुंबच आपला आदर्श असल्याचे कविशने ‘लोकमत’ला सांगितले. त्याचे आई-वडील येथेच बँकींग क्षेत्रात कार्यरत आहेत. अभ्यासातील सातत्य कायम ठेवल्यास सर्वाधिक गुण मिळविणे शक्य असल्याचे कविशने सांगितले.तिघेही भाऊ दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्णघरातील वातावरण अभ्यासमय असेल तर मुल तितकीच गुणवंत होतात, याचाच प्रत्यय पांडे कुटुंबीयांना आला आहे. कविश आणि केतन ही जुळी भावंडे आहेत. त्या दोघांनाही चांगले गुण मिळाले आहेत. कविश जिल्ह्यात प्रथम आहे. केतनला ८८.८९ टक्के गुण मिळाले आहेत. कविशचा चुलत भाऊ केयूर विवेक पांडे याला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. एकाच कुटुंबात एकाच ठिकाणी वास्तव्याला असणाºया पांडे परिवाराला एकत्रपणामुळे गुणवत्तेत भरारी घेता आली, अशी प्रतिक्रिया कविशचे वडील आनंद पांडे यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात ‘सीबीएसई’ दहावीत मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM
यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ टक्के, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा निकाल ९८ टक्के लागला. घाटंजी तालुक्याच्या बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे.
ठळक मुद्देमहर्षीचा कविश पांडे अव्वल : ‘वायपीएस’ची कनिष्का गाडे द्वितीय, निधी जाधव तिसरी