शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

सीसीटीव्ही बंद, खबऱ्यांचा खर्चही खिशाला परवडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 10:40 PM

सीसीटीव्ही बंद असल्याने एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. शिवाय चोरटेही सतर्क झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आपली ओळख पटवतील या भीतीने चोरटे पूर्ण चेहरा झाकूनच चोरी करताना अनेक फुटेजमध्ये आले आहे. या कारणाने या चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण होत आहे. परंपरागत खबरे आता परवडेनासे झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात गुन्हेगारी वाढली आहे. रस्त्यावर गुन्हे घडतात. वाटमारी होते. यासह चोरी-घरफोडीही सातत्याने सुरू आहे. दुचाकी चोर तर बेफाम झाले आहेत. या चोरांना शोधण्यासाठी लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षांपासून बंद आहे. मुळात कॅमेरे लावण्यातच अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांना आपल्या परंपरागत खबऱ्यांच्या नेटवर्कवरच अवलंबून राहावे लागत आहे. सीसीटीव्ही बंद असल्याने एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. शिवाय चोरटेही सतर्क झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आपली ओळख पटवतील या भीतीने चोरटे पूर्ण चेहरा झाकूनच चोरी करताना अनेक फुटेजमध्ये आले आहे. या कारणाने या चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण होत आहे. परंपरागत खबरे आता परवडेनासे झाले आहेत. 

यवतमाळातील सीसीटीव्ही नावालासुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र यात मोठा भ्रष्टाचार झाला. सदोष कॅमेरे लागले. त्यामुळे या कॅमेराच्या मदतीने एकही गुन्हा उघडकीस आला नाही. 

चोरट्यांची नजर सीसीटीव्हीवरच चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत याची रेकी करतात. या कॅमेऱ्याची दिशा बदलवून कॅमेरा तोडून नंतर चोरीचा डाव साधला जातो. त्यामुळे चोरांपर्यंत पोहोचण्यात उपयोग होत नाही. 

खबऱ्यांचा खर्च परवडेनाखबऱ्यांच्या भरवश्यावर गुन्हे उघड आणण्याचे प्रमाण ठरते. अनेक पोलीस-कर्मचारी अधिकारी स्वत:चे स्वतंत्र नेटवर्क उभारतात.  आता खबऱ्यांकडून मोठी डिमांड केली जात आहे. दारू, मटनासोबतच रोख पैसेही खबरे मागत आहेत. त्याशिवाय बोलण्यास तयार होत नाही. 

 पैसे माेजूनही होते फसवणूक  

गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी खबऱ्यांना जवळ केले जाते. बहुतांश वेळ खबऱ्या माहिती देण्यापूर्वी मोठी टीप असल्याचे सांगत पैसे मागतात. प्रत्यक्ष कारवाईत मात्र फारसे काही हाती लागत नाही. यामुळे पैसे माेजूनही पोलिसांची खबऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

सीसीटीव्ही फुटेज असूनही चोर ओळखणे कठीण  

शहरातील मेन लाईनमध्ये चोरी करतानाचे चोर सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये आले आहे. स्पष्ट दिसत असूनही चोरांची ओळख पटविताच आली नाही. 

चोरही झाले शिरजोर. सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत हे गृहित धरूनच गुन्हा करताना चोरटे चेहरा पूर्णत: झाकून घेतात. इतकेच काय शारीरिक हालचाली ही बदलतात.  

टॅग्स :cctvसीसीटीव्हीThiefचोर