तळणी : कोरोनाच्या संकटात सापडलेले संपूर्ण उत्सव खबरदारी घेऊन साजरे केले जात आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून साजरा करण्यात आला.
तळणी येथे दरवर्षी मोठ्या आनंदोत्सवात रमजान ईद साजरी केली जाते. गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा परिणाम झाला आहे. याही वर्षी प्रत्येकाने ईदची नमाज आपापल्या घरी अदा केली. गावातील इदगाहवर शासन आदेशाप्रमाणे मौलाना मुश्ताक शेख व मौलाना सद्दाम कुरेशी यांच्यासह केवळ पाच लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून नमाज अदा केली.
हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी घाटंजी पोलिसांकडून ईदच्या पहिल्या
दिवशी येथील मशिदीसमोर नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.