शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

जिल्हाभर शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

By admin | Published: March 11, 2015 1:53 AM

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

यवतमाळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. बाभूळगाव येथे शिवसेना शहर प्रमुख नंदकिशोर अडेकार यांच्या नेतृत्वात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष ढवळे, वाघापूरचे सरपंच संजय कोल्हे, वसंतराव कंगाले, तालुका प्रमुख जनार्दन झाटे, तालुका संघटक रमेश पराते, महिला आघाडी संघटक रंजना घटे, महादेवराव गर्जे, प्रल्हाद डेहणकर, भानूदास राऊत उपस्थित होते. शिवछत्रपती चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील मुख्य मार्गांवरुन काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील ‘बाल शिवाजी’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसंगी संतोष ढवळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांसाठी उपतालुका प्रमुख संतोष ठावरे, गजानन कोळणकर, चंद्रशेखर केळतकर, अनिल गावंडे, विजय गलाट, विक्की बऱ्हाणपुरे, तिलक जाधव, विक्की बोरकर, रामू वाघाडे, घनशाम जांभोरे यांनी पुढाकार घेतला. घाटंजी येथे शोभायात्रा घाटंजी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोलताशांच्या गजरात येथे मिरवणूक काढण्यात आली. शिवपूजनाने शिवाजी चौकातून शोभायात्रेला सुरूवात झाली. यात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सवासाठी समितीचे अध्यक्ष निखिल देठे, हर्षल भोयर, प्रणव भारती, प्रतीक राठोड, मंदार चौधरी, प्रशांत राठोड, वैभव मलकापुरे, अमीत पडलवार, पिंटू झाडे, पुष्कर कुर्जेकर, शुभम देशमुख, अक्षय धाटे, सुहास दिकुंडवार, शुभम शितापकर, शाम भांदककर, अभिजित भारती, विशाल जाधव, स्वप्नील ठाकरे, बंटी ठाकरे, तेजस येरावार, छोटू उईके, गजू भोयर आदींनी पुढाकार घेतला. विसावा कॉलनी, पिंपळगाव यवतमाळ : स्थानिक पिंपळगाव भागातील विसावा कॉलनीत शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ओमप्रकाश देसाई, तायवाडे, गायधने, नीत, ठाकरे आदींनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांनी शिवकार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी सैयद अली, किरणापुरे, रत्नपारखी, अर्धापूरकर, आगलावे, इंगोले, डॉ. चौधरी, जयस्वाल, आकाश इंगोले आदींनी पुढाकार घेतला. उत्तरवाढोणा सोनखास : उत्तरवाढोणा येथे शिवसेनेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. यात शाखा प्रमुख निरंजन लांजेवार, विभाग प्रमुख अनिल चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित चव्हाण, अंजेश माने, रामनाथ देवकते, मुकींदा गुरड, मंगेश अलोणे, राहुल गुरड, डॉ. सुरेश खांदवे, संजय माने, विनोद आडे आदी सहभागी झाले होते. शिवसेना वडगाव शाखायवतमाळ : शिवसेना वडगाव विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. उपतालुका प्रमुख अतुल गुल्हाने यांच्या पुढाकारात शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, किशोर इंगळे, संजय रंगे, मोरश्वर चरेगावकर, गोविंद गावंडे, दीपक सुकळकर, सुरेश शिरभाते, प्रकाश लांजेवार, रामेश्वर ढोबळे, राजू हनवते, मनोहर भुसारी, प्रभाकर देवकर, अरुण शरतकर, अशोक काळमोरे उपस्थित होते.