शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

क्षमापन दिवस एकाच दिवसी साजरा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:48 PM

जैन समाजात क्षमापन दिवस साजरा करण्याची एक तारीख नाही. समाजातील काही लोकांमध्ये असलेल्या मतभेदातून यासाठी आजपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही.

ठळक मुद्देकळंब येथे नवकार जाप समारोह : जैन समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : जैन समाजात क्षमापन दिवस साजरा करण्याची एक तारीख नाही. समाजातील काही लोकांमध्ये असलेल्या मतभेदातून यासाठी आजपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही. परंतु किमान धार्मिक कार्यासाठी तरी समाजातील लोकांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा लोकमतचे यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी व्यक्त केले.कळंब येथे छ.ग.प्रवर्तक प.पू.गु. रतनमुनिजी म.सा. यांच्या सहवासात सुरु असलेल्या चार्तुमास कार्यक्रमाच्यानिमित्त आयोजित नवकार जाप समारोह समापन कार्यक्रमात किशोर दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प.पू.गु. रतनमुनिजी म.सा., सतीशमुनीजी म.सा., शुक्लमुनिजी म.सा., रमनमुनिजी म.सा., आदित्यमुनिजी म.सा. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पुढे बोलताना किशोर दर्डा म्हणाले, भगवान महावीर जयंतीची शासकीय सुट्टी दिली जाते. परंतु क्षमापन दिवसाची अजुनही सुट्टी जाहीर झालेली नाही. यासाठी समाजातील अनेक पंथीय लोकांमध्ये असलेले मतभेद कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु आता लोकांनी एकत्र येत एकमेकांसोबत बंधुभाव ठेवला पाहीजे, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली.किशोर दर्डा म्हणाले, आपण कल्पनाही करु शकत नाही, इतकी मोठी शक्ती नवकार मंत्रात आहे. नवकार मंत्रात मानव कल्याणाचे सामर्थ्य आहे. कळंबचे रहीवाशी मोठे भाग्यशाली आहे, त्यांना इतक्या मोठ्या उंचीच्या संताचा सहवास मिळातो आहे. लहानपणापासूनच गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्याची संधी मला मिळाली, हे माझे परम भाग्य आहे. त्यासोबतच गुरुदेवांची वाणी घराघरात पोहचविण्याचे संधी लोकमतच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, याचा मोठा आनंद आहे, असेही किशोर दर्डा म्हणाले.यावेळी पारसमल दुगड (आर्णी), स्वरुपचंद बोथरा (वर्धा), रतनलाल सुराणा, महेंद्र बोथरा (कुंभा), डॉ.सारिका शहा, पंकज भंडारी (वणी) आदींची उपस्थित होती. यावेळी नेहा सुरेश बोथरा यांचे ११ तर ज्योत्स्रा रविंद्र कोठारी यांच्या ९ उपवासाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा तातेड व अंजु नागडा यांनी तर आभार धर्मेश कोठारी यांनी मानले.