यवतमाळ : जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांनी जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा बदलत आहे. त्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. या उपक्रमांचा राष्ट्रीय स्तराव सन्मान म्हणून शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांना एनयूईपीए पुरस्कार दिल्ली येथे प्रदान केला जाईल.केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या एनयूईपीए (नॅशनल यूनिव्हर्सिटी आॅफ एज्युकेश्नल प्लॅनिंग आणि अॅडमिनिस्ट्रेशन) या संस्थेतर्फे त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना केंद्रीय मानव संसाधन व सांस्कृतिक मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे गौरविण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी म्हणून अवघ्या वर्षभरापूर्वीच डॉ. सुचिता पाटेकर यांनी पदभार स्वीकारला आहे. कारकीर्दीच्या पदार्पणातच त्यांनी विविध उपक्रमांचा धडाका सुरू केला. गावकरी वाचनालय, पुस्तक भिशी, डीजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, आयएसओ फाईल, तंबाखूमुक्त शाळा, फटाकेमुक्त दिवाळी असे अनेक उपक्रम त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून राबविले. या पुरस्कारांच्या निमित्ताने शैक्षणिक उपक्रमांची दखल घेतली गेली. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना केंद्राचा पुरस्कार
By admin | Published: November 21, 2015 2:51 AM