शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

केंद्राचे पथक आज यवतमाळात

By admin | Published: June 02, 2016 12:07 AM

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवार २ जून रोजी जिल्ह्यात येणार आहे.

दुष्काळी उपाययोजना : जलयुक्त शिवार योजनेची पाहणी यवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवार २ जून रोजी जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच गावांना पथक भेट देणार असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यासोबतच जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी करणार आहे. यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली आहे. यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नाही. न्यायालयाने राज्य शासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. त्यानंतर शपथपत्रात उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे गावपातळीवर शेतकऱ्यात संताप दिसत आहे. आता या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक गुरुवारी यवतमाळात दाखल होत आहे. नागपूरहून सदर पथक सकाळी ९ वाजता यवतमाळात दाखल होणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पावर सुरू असलेल्या लोकसहभागाच्या कामाची पाहणी करेल. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील कीटा गावाला भेट देईल. त्यानंतर पथक अमरावती जिल्ह्यात जाणार आहे. त्यावेळी मार्गावरील चिंचबर्डी आणि लासीना गावाला भेट देण्याची शक्यता आहे. या गावातील शेतकऱ्यांशी पथकातील अधिकारी संवाद साधणार आहे. (शहर वार्ताहर)प्रशासन सज्ज केंद्राचे पथक जिल्ह्यात येत असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. भेटी देणाऱ्या गावाची यादी प्रशासनाने तयार केली आहे. सदर पथक शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि परिस्थिती पाहून केंद्राला काय अहवाल देतात यावर मदतीचे गणित अवलंबून आहे. मात्र या दौऱ्याबाबत प्रशासनाने गोपनीयता ठेवली होती.