शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

सीईओ जेव्हा विद्यार्थ्यांचा घेतात क्लास..! सावरगडच्या शाळेला भेट

By अविनाश साबापुरे | Published: April 12, 2024 4:12 PM

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना केले आवाहन.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : सकाळी सात वाजता शाळा भरली... गुरुजी शिकवित असतानाच अचानक सीईओ मंदार पत्की यांनी शाळेत धडक दिली. गुरुजींची तारांबळ उडाली, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन सर आले म्हणून आनंद पसरला... तर समोर निरागस मुले पाहून सीईओंनी पटकन् खडू उचलला अन् फळ्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांचा ‘क्लास’ सुरू केला... ‘साहेबां’चे शिकविणे पाहून गुरुजींही आनंदून गेले...

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शाळा खेड्यात तर अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. या शाळा आणि तेथील विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी सध्या प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ एप्रिलला सावरगड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सीईओ मंदार पत्की (आयएएस) यांनी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. इंग्रजी विषयाचे वाचन, संख्यावरील क्रिया व खेळ आदींबाबत पत्की यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत अध्यापनाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. या अध्यापनाने केवळ विद्यार्थीच नव्हेतर शिक्षकही चार्ज झाले. सीईओ मंदार पत्की यांनी आनंददायी अध्यापनाचा कृतीतून धडा दिला, अशी प्रतिक्रिया शिक्षकांतून उमटली.यावेळी सीईओंनी शाळेतील पिण्याच्या पाण्यासह परिसर स्वच्छता, शौचालय स्वच्छता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता आदी बाबींची तपासणी केली. तसेच उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी सीईओंसह यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी, पंचायत विस्तार अधिकारी अरुण भोयर, केंद्र प्रमुख सारंग भटुरकर, मुख्याध्यापक विकास झाडे, राजहंस मेंढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाYavatmalयवतमाळ