शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

दांडीबहाद्दर शिक्षकांवर सीईओंचा रोज ‘वॉच’

By admin | Published: January 04, 2017 12:10 AM

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दांडीबहाद्दर शिक्षकांची हजेरी आता प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी

आॅनलाईन दणका : हालचाल रजिस्टर ई-मेलवर यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दांडीबहाद्दर शिक्षकांची हजेरी आता प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तपासणार आहेत, तीही रोजची रोज. यात गडबड आढळल्यास कारवाईचा पहिला दणका संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना बसणार आहे. याबाबतचा आदेश सीईओ आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी बीईओंना पाठविण्यात आला. सीईओंच्या आदेशानुसार, आता प्रत्येक शिक्षकाची हजेरी नोंदविल्यावर मुख्याध्यापकाला हजेरी रजिस्टरचा व हालचाल रजिस्टरचा फोटो काढून केंद्रप्रमुखाला व्हॉट्सअप करावा लागणार आहे. १०.३५ वाजता हा फोटो मिळालाच पाहिजे. केंद्रप्रमुखांना आपल्या केंद्रातील असे सर्व फोटो प्राप्त होताच सर्व शाळांच्या हजेरीचा संकलित अहवाल तयार करायचा आहे. फोटो व हा अहवाल ११.१५ वाजताच्या आत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर किंवा ई-मेलवर पाठवावा लागणार आहे. पंचायत समिती अंतर्गत सर्व केंद्रप्रमुखांचे अहवाल आणि फोटो मिळाल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळानिहाय अहवाल तयार करावा लागेल. बीईओंचा हा अहवाल कोणत्याही परिस्थितीत १२ वाजताच्या आत जिल्हास्तरावर उपशिक्षणाधिकाऱ्यांना ई-मेल करावा लागणार आहे. सर्व सोळाही तालुक्यांतून येणारे शिक्षक हजेरीचे हे अहवाल १२.३० वाजता सीईओ दीपक सिंगला यांच्यासमोर सादर करावे लागणार आहेत. रोज हालचाल रजिस्टरही तपासले जाणार असल्याने दौरा, बैठक अशा नावाखाली दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर आळा बसणार आहे. शाळा ते जिल्हा परिषद अशीही आॅनलाईन ‘रिपोर्टिंग’ निर्विघ्न होण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. मात्र मुख्याध्यापकाला या निमित्ताने एक जागा का करावे लागणार आहे. अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने १०.३५ वाजताच्या आत हजेरी रजिस्टरचा फोटो मेल करणे कठीण जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) वेतन कपातीसह प्रशासकीय कार्यवाही शिक्षकांच्या उपस्थितीचा मेल सादर न झाल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विलंबाने येणारे, तसेच अनधिकृतपणे गैरहजर राहणारे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे वेतन कापण्यात येईल. प्रशासकीय कार्यवाहीदेखील करण्यात येईल, असे सीईओंच्या आदेशात म्हटले आहे. शिक्षक वेळेवर हजर असतात की नाही, हे तपासण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके तयार करून शाळांना आकस्मिक भेटी दिल्या जाणार आहेत. अनेक जण शाळेत विलंबाने येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. काही गावांमध्ये मोबाईल रेंज नाही, याची कल्पना आहे. परंतु, कधीतरी पाऊल उचलावेच लागणार होते. गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना याबाबत नियोजन करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतर अंमलबजावणी करावीच लागेल. - डॉ. सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ