शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

अट्टल सोनसाखळी चोराला केले जेरबंद

By सुरेंद्र राऊत | Published: May 02, 2023 7:54 PM

त्यावर तपास केंद्रीत करून पोलिस आरोपीच्या दिग्रस येथील घरापर्यंत पोहोचले.

सुरेंद्र राऊत, यवतमाळ : दारव्हा, आर्णी आणि यवतमाळ शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. सोमवारी आर्णी व दारव्हा येथे दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून या चोरट्याने पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास पथक गठित करीत तीन शहरातील १०० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज चेक केले. त्यामध्ये एमएच-२७-सीपी-७१४६ ही स्पोर्ट बाईक आढळून आली. त्यावर तपास केंद्रीत करून पोलिस आरोपीच्या दिग्रस येथील घरापर्यंत पोहोचले.

गब्बर शाह मजीद शाह (२४) रा. शहापूर ता. दिग्रस असे या आरोपीचे नाव आहे. त्याने संपूर्ण जिल्ह्यातच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहे. यातील बहुतांश गुन्हे उघडकीस येण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला. आर्णी ठाणेदार श्याम सोनटक्के व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी हे या गुन्ह्यांचा तपास करीत आहे. या कारवाईत उपनिरीक्षक गजानन अजमिरे, विजय चव्हाण, अरुण पवार, संतोष गावंडे, नफीस शेख, ऋषिकेश इंगळे, मनोज चव्हाण, अरविंद जाधव, योगेश संकुलवार, मिथून जाधव, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे हे सहभागी झाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस