शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

चैतालीचे गाव जिल्हा परिषदेला दत्तक

By admin | Published: January 14, 2016 3:25 AM

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी मोझर गावाला भेट दिली.

सीईओंचा पुढाकार : आंदणात शौचालय मागणारी स्वच्छतादूतनेर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी मोझर गावाला भेट दिली. आंदणात शौचालय मागून महाराष्ट्राची स्वच्छतादूत बनलेली मोझरची सून चैताली राठोड (माकोडे) हिच्याशी संवाद साधून त्यांनी विकासासाठी या गावाला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. चैताली राठोड हिने पित्याला आंदणात रेडिमेड शौचालय मागितले. स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या चैतालीची कीर्ती सुलभ इंटरनॅशनल संस्थेकडे दिल्लीला पोहोचली. तिला दिल्लीला बोलाविणे आले. तिथे तिचे सन्मान झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राची स्वच्छतादूत म्हणून तिला सन्मानित करण्यात आले. मात्र या कुटुंबाला आजही विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले. याची दखल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी पी.आर. राठोड, विस्तार अधिकारी किशोर सरफ, स्वच्छ भारत मिशनचे महेंद्र गुल्हाने, राहुल देशमुख, मुकुंद येवतकर, ग्रामसेवक संजय परळीकर आदींनी चैताली व देवेंद्र माकोडे या दाम्पत्याची भेट घेतली. वृक्ष रोपटे देवून चैतालीला सन्मानित केले. यावेळी सरपंच पूजा साखरवाडे, उपसरपंच उघडे यांच्याशी चर्चा करून गावाला विकासापर्यंत नेण्याच्या उपाययोजनेबाबत मंथन केले. गावाला संपूर्ण हागणदारीमुक्त करून घराघरात शौचालय बांधण्याचा संकल्प सीईओ कलशेट्टी यांनी सोडला. यावेळी सीईओंच्या हस्ते तीन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)