यवतमाळ : राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार जिल्हा शाखेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती. चर्मकार समाजासाठी बाबू जगजीवनराम यांच्या नावाने केंदीय चर्मकार आयोग झाला पाहिजे, बाबू जगजीवनराम यांना भारतरत्न बहाल करावा, संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यासोबतच गुजरातमध्ये दलित बांधवांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याणमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष खुशालराव डवरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिश पाचकोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य देवानंद तांडेकर, जिल्हाध्यक्ष नरेश खरतडे, सल्लागार नरेश बच्छराज, युवा जिल्हाध्यक्ष रवी बच्छराज, गटई जिल्हा प्रमुख किसनराव मालखेडे, उपाध्यक्ष परशुराम मराठे, गणेश बच्छराज, अरुण गवळी, हेमंत वनकर, राम बच्छराज, सोनू यावर, सुनील खरूळे, सुरज पाली, संदीप पाली, प्रदीप पाली, शेख इमरान, कैलास काने आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
चर्मकार महासंघाची कचेरीवर धडक
By admin | Published: July 22, 2016 2:18 AM